मुंबई

दिवाळीच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक कंदिलांना पसंती

CD

दिवाळीच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक कंदिलांना पसंती
सोसायट्या, राजकीय पक्षांकडून एकसंध सजावटीचा नवा ट्रेंड; कारागिरांची लगबग
प्रभादेवी, ता. ५ (बातमीदार) ः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध भागांत रोषणाई आणि सजावटीची लगबग सुरू झाली आहे. यंदा घरांच्या सजावटीबरोबरच गृहनिर्माण सोसायट्या आणि राजकीय पक्षांकडूनही सामूहिक सजावटीला प्राधान्य दिले जात आहे. विशेषतः एकाच संकल्पनेतील, पर्यावरणपूरक आणि मोठ्या आकाराचे कंदील लावून परिसर उजळविण्याचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे.
दिवाळीनिमित्त विविध राजकीय पक्षांनी पक्ष कार्यालयांसह मतदारसंघातील परिसराच्या सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात कंदिलांच्या ऑर्डर दिल्या आहेत. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनीही इमारतीत मोठे कंदील लावण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कंदिलांऐवजी एकाच डिझाइनचे आणि मोठ्या आकाराचे कंदील खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.
यंदा प्लॅस्टिकऐवजी कागद, बांबू आणि रंगीत कापड यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या कंदिलांना पसंती मिळत आहे. पारंपरिक कलाकुसरीला आधुनिक रचनेची जोड देत एलईडी दिव्यांनी सजविलेले कंदीलही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे आकर्षक सजावटीसोबत पर्यावरणपूरकतेलाही महत्त्व दिले जात आहे.
यंदा विविध राजकीय पक्षांकडून १०० हून अधिक, तर सुमारे २५ गृहनिर्माण सोसायट्यांकडून कंदिलांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. सोसायट्यांमध्ये एकाच प्रकारचे कंदील लावण्यावर भर असल्याने एकाच डिझाइनचे कंदील मोठ्या संख्येने तयार करावे लागत आहेत, अशी माहिती कंदील विक्रेते रवी बेतबंसी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मालक अचानक घरी आला, १९ वर्षीय लेकीला कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, पुढे जे घडलं ते...; थरकाप उडवणारी घटना

IND vs NZ 2nd ODI : भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा सामना केव्हा? किती वाजता सुरू होणार अन् Live कुठे पाहता येणार

Mahua Moitra: 'सीजेपीला विदेशातून नव्हे, तर भाजपकडूनच फंडींग!' भाजपच्या आरोपांवर महुआ मोइत्रांचा 'गुगली'?

Latest Marathi News Live Update : "स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही"; माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा स्पष्ट कायदेशीर सल्ला

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याला नवे नेतृत्व! राजवर्धन शिंदे तिसऱ्यांदा अध्यक्षपदी; संग्राम सोरटे उपाध्यक्ष

SCROLL FOR NEXT