मुंबई

गंजाडच्या विद्यार्थ्यांना क्रीडाभरारीचे बळ

CD

गंजाडच्या विद्यार्थ्यांना क्रीडा भरारीचे बळ

१,६४५ विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशाचे वाटप

कासा, ता. ५ (बातमीदार) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा आणि त्यांना स्पर्धांसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गंजाड ग्रामपंचायतीने स्तुत्य उपक्रम राबविला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील १३ जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या एक हजार ६४५ विद्यार्थ्यांना २ व ३ नोव्हेंबर रोजी क्रीडा गणवेशाचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता असूनही अनेकदा आवश्यक सुविधा व प्रोत्साहनाचा अभाव जाणवतो. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा विकासालाही प्राधान्य दिले आहे. येत्या डिसेंबरमध्ये केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा होणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे. या स्पर्धांमधून जिल्हा व विभागीय स्तरावर यश मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावरही चमकू शकतात. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत यापुढेही विविध उपक्रम राबविणार असल्याचे सरपंच अभिजित देसक यांनी सांगितले. या वेळी उपसरपंच कौशल कामडी, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रवीण वरठा, केंद्रप्रमुख महेश शेकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : नागपुरात भाजपची 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' रॅली

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT