उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या आणि विषारी रसायनांचा समावेश असलेल्या फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर महापालिकेने बंदी घातली आहे. तसेच नागरिकांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पर्यावरण विभागाचे उपायुक्त स्नेहा करपे यांनी केले आहे. नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही फटाके विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने फटाके विक्रेते आणि नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करण्यास मनाई आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथियम, आर्सेनिक, शिसे आणि पारा यांसारखे घातक घटक असलेल्या फटाक्यांवर बंदी असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. फटाके विक्रेत्यांनी स्फोटक अधिनियम आणि संबंधित नियमांचे पालन करून महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी अधिकृत परवानगी घेऊनच फटाक्यांची विक्री करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पर्यावरणपूरक वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन
राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियान ७.० आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत फटाकेमुक्त, प्लॅस्टिकमुक्त आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी प्लॅस्टिकऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. तसेच पर्यावरणपूरक वस्तूंना प्राधान्य द्यावे. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी महापालिकेच्या १८००२३३११०१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पर्यावरण विभागाच्या उपायुक्त स्नेहा करपे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.