मुंबई

ठाण्यात नव्या इमारतींचे पाणी तापले!

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ओसी प्राप्त नव्या इमारतींचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या घोषणेवरून ठाणे महापालिकेत आज (ता. ५) चांगलेच वातावरण तापले. आयुक्तांची परवानगी न घेता अधिकाऱ्यांनी परस्पर अशी भूमिका जाहीर केल्याने आयुक्त सौरभ राव यांनी पाणीपुरवठा विभाग आणि नगर अभियंत्यांना फैलावर घेतल्याची माहिती आहे. नव्या इमारतींचा पाणीपुरवठा बंद करण्याचा कोणताही निर्णय प्रशासनाने घेतलेला नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच पाणीपुरवठ्याबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतः अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

संभाव्य सुपर एल निनोमुळे आगामी काळात पर्जन्यमान घटण्याची आणि जलसाठ्यावर ताण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने पाणीबचतीचे नियोजन सुरू केले आहे. मात्र, या नियोजनाच्या नावाखाली वापर परवाना (ओसी) मिळालेल्या नव्या इमारतींचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी (ता. ४) समोर आली होती. त्यामुळे नव्या इमारतींमधील रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या वृत्तानंतर शहरातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आयुक्त सौरभ राव यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि नगर अभियंत्यांची बैठक घेतली.

ठाण्यात निर्णय आयुक्तांची मान्यता नसताना परस्पर कसा जाहीर करण्यात आला, असा सवाल त्यांनी केल्याचे समजते. अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे प्रशासनाचीच अडचण झाल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीनंतर महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात नव्या इमारतींच्या पाणीपुरवठ्याबाबत खुलासा करण्यात आला.

आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा!
नवीन आणि जुन्या इमारतींना आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा होईल, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. वापर परवाना प्राप्त इमारतींचा पाणीपुरवठा बंद करण्याबाबत कोणताही निर्णय तूर्त घेण्यात आलेला नाही, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Threat: एकसोबतच 16 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; हवेतच बदलले मार्ग.. बचावासाठी पाठवले फायटर जेट्स

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका संघातील वनडे सामना दिल्लीतून अचानक हलवला, आता कोणत्या मैदानात होणार मॅच?

CJP Protest: पुन्हा जंतर-मंतर! SIRच्या विरोधात सीजेपीचे ७ नोव्हेंबरला आंदोलन; ठिकाणही ठरले

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

SCROLL FOR NEXT