मुंबई

दिवाळीच्या प्रकाशात ज्येष्ठांचे चेहरे उजळले!

CD

दिवाळीच्या प्रकाशात ज्येष्ठांचे चेहरे उजळले!
‘सकाळ यिन’तर्फे जीवन अंकुर वृद्धाश्रमात आरोग्य तपासणी, मनोरंजनात्मक खेळ आणि दीपोत्सव
चेंबूर, ता. ६ (बातमीदार) ः कुर्ला येथील कामगार नगरमधील माधव बाग परिसरातील जीवन अंकुर वृद्धाश्रमात ‘सकाळ यिन’च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि दिवाळी आनंदोत्सव पार पडले.
आरोग्य तपासणी, मनोरंजनाचे खेळ आणि दिव्यांच्या प्रकाशात साजऱ्या झालेल्या दिवाळीमुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. या शिबिरात विविध महापालिका रुग्णालयांतील डॉक्टरांनी ज्येष्ठ वृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये डोळे, रक्तदाब, कान-नाक-घसा, एक्स-रे इत्यादी तपासण्यांचा समावेश होता. तसेच आयुष्मान भारत कार्डसंदर्भातील सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
आरोग्य तपासणीबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ आणि व्यायाम घेण्यात आले. हौजी खेळात ज्येष्ठांनी उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दिवे प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्यात आली. एकत्रितपणे सण साजरा करण्याची संधी मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता.
या कार्यक्रमाचे आयोजन ‘यिन’च्या मुख्यमंत्री रिया खानोलकर आणि सिद्धी देवळेकर यांनी केले. टिंकूस कॅफेच्या वतीने उपस्थितांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. पोद्दार महाविद्यालयाचे प्राध्यापक अक्षय टिंगणवार, ‘यिन’चे पालकमंत्री सारंग शिरसागर, समृद्धी अधिकारी, अस्मित गावकर तसेच पोद्दार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य विभागाने कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

मी लहान असतानाच माझ्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यामुळे बालपणापासूनच आई-वडिलांच्या मायेची उणीव अनुभवली. ज्येष्ठांसाठी काहीतरी करावे आणि त्यांना प्रेम, आपुलकी व आधार मिळावा, हे माझे स्वप्न होते. त्यातूनच एक वर्षापूर्वी जीवन अंकुर वृद्धाश्रम सुरू केला. येथील ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम मिळावे, हा आमचा प्रयत्न आहे.
- बाबू गौरावेणी, संस्थापक
जीवन अंकुर वृद्धाश्रम

आमच्यासाठी दिवाळीचा सण अशा पद्धतीने साजरा केला जाईल याची अपेक्षा नव्हती. ‘सकाळ यिन’च्या या उपक्रमामुळे आम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत सण साजरा केल्याचा आनंद मिळाला. डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली, खेळ खेळवले आणि आमच्या हस्ते दिवे लावून दिवाळी साजरी केली. काही क्षणांसाठी का होईना एकटेपणाची जाणीव दूर झाली.
- राधा कृष्ण राव, ज्येष्ठ नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Baba Controversial Statement Row : "ईशनिंदेला माफी नाही, राज्यात पाय ठेवू देणार नाही!"; प्रभू श्रीकृष्णावरील 'त्या' विधानावरून देशात मोठा भडका; दोन दिग्गज नेत्यांमध्ये थेट युद्ध

CBSE Date Sheet 2027: सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा...

Nashik TCS Case: एमआयएम नेते इम्तियाज जलील अधिकृतपणे सहआरोपी; संजय शिरसाटांचा "त्याला तुरुंगात जावेच लागेल" असा थेट घणाघात

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

SCROLL FOR NEXT