उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : दिवाळीच्या खरेदीसाठी उल्हासनगरच्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड उडत असतानाच चोरटे, खिसेकापू आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. नेहरू चौक ते सिरू चौक परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला जात आहे. बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारण्यात येत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलू लागल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. विशेषतः कॅम्प क्रमांक दोनमधील नेहरू चौक ते सिरू चौक परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे आणि खिसेकापूंनी नागरिकांना लक्ष्य करू नये, यासाठी पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. खरेदी करताना मोबाईल, दागिने, पाकीट आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याचे; तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वाहतुकीवर नियम
दुसरीकडे, बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आता वाहतूक पोलिसांनीही कंबर कसली आहे. विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत खरेदी करता यावी, यासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडून विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांनीही सतर्क राहून वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.