मुंबई

लक्ष्मीपूजन, भाऊबीजेनिमित्त दादरमध्ये खरेदीला वेग!

CD

लक्ष्मीपूजन, भाऊबीजेनिमित्त दादरमध्ये खरेदीला वेग!
बहिणींसाठी भेटवस्तू, मिठाई, कपडे, सौंदर्यप्रसाधनांना पसंती
प्रभादेवी, ता. ६ (बातमीदार) ः दिवाळीतील लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज सण दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने दादरच्या बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढली आहे. भाऊबीजेनिमित्त बहिणीला ओवाळणी देण्यासाठी भाऊ विविध भेटवस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे दादरमधील प्रमुख बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने गजबजू लागल्या आहेत.
लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती, पूजेची ताटे, दिवे, पणत्या, अगरबत्ती, धूप, हळद-कुंकू, फुले आणि हार यांना विशेष मागणी आहे. तसेच पूजेसाठी लागणारी फळे, नारळ आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. फुलांच्या दुकानांमध्ये झेंडूच्या फुलांसह विविध प्रकारच्या फुलांच्या हारांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते जपणारा सण असल्याने या दिवशी बहिणीला खास भेट देण्याची परंपरा आहे. त्यासाठी साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्ती, सौंदर्यप्रसाधने, दागिने, घड्याळे, पर्स, चॉकलेट्स तसेच आकर्षक भेटवस्तूंना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. याशिवाय मिठाईच्या दुकानांमध्येही विविध प्रकारच्या मिठाई आणि फराळाच्या पदार्थांची खरेदी सुरू आहे.
दादरच्या रानडे रोड, गोखले रोड, कबुतरखाना परिसर तसेच रेल्वे स्थानक परिसरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. अनेक जण आपल्या बजेटनुसार बहिणीसाठी आकर्षक आणि उपयुक्त भेटवस्तू निवडताना दिसत आहेत. काही दुकानदारांनी भाऊबीजेनिमित्त खास गिफ्ट पॅक आणि आकर्षक पॅकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवसांत खरेदीसाठी आणखी गर्दी वाढण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाऊबीजेच्या निमित्ताने दादरची बाजारपेठ पुन्हा एकदा सणाच्या उत्साहात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

MBBS Admission: लाखो इच्छुक तरी एमबीबीएसच्या जागा रिक्त का? नीट उत्तीर्ण असूनही अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे का स्वप्न भंगले?

Vaibhav Chavan Case news: वैभव चव्हाणला जीवाची भीती होती? मृत्यूपूर्वीच्या दोन ऑडिओ क्लिप्समुळे खळबळ!

Latest Marathi News Update : 'गोकुळ' दूध संघात चार शासकीय सदस्य नियुक्त्यांच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

SCROLL FOR NEXT