सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल चोरट्यांनी आयफोनधारकांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. ठाणे रेल्वे स्थानकात गर्दीचा फायदा घेत खिशातील महागडे फोन चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्या असून, नोव्हेंबरच्या पहिल्या पाच दिवसांत सात प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी ठाणे रेल्वे पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. चोरीला गेलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे चार लाख २४ हजार रुपये आहे. याप्रकरणी एका संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
रणजित वरकुटे (वय २२), मोहम्मद युसुफ काझी (२२), रुत्तमा शेट्टी (७४), श्रीराम खंदाडे (४७), बाग स्वर्ण नेथन (३०), पंकज दरगड (४६) आणि ऋषिकेश कदम (२६) अशी तक्रारदारांची नावे आहेत. यातील बहुतांश घटना लोकलमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन घडल्या. काही प्रवाशांचे मोबाईल खिशातून काढण्यात आले, तर एका ज्येष्ठ महिलेची प्रवासादरम्यान झोपेचा फायदा घेऊन बॅगच चोरीला गेली. दरम्यान, ३ नोव्हेंबरला बाग स्वर्ण नेथन यांचा आयफोन चोरीला गेल्यावर त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी करण तेलकर (२८, रा. मुंब्रा) याला पकडले. मोबाईल चोरीच्या घटनांप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धर्मेंद्र आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.