मुंबई

गॅस कंपनीच्या नावाने सायबर फसवणूक

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : महानगर गॅस कंपनीच्या नावाने आलेल्या पत्राचा आधार घेत सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची सहा लाख ५८ हजार २९६ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वर्तकनगर येथे समोर आला आहे. गॅस ग्राहकाच्या नावात बदल करण्यासाठी अवघे १३ रुपये शुल्क भरण्याच्या बहाण्याने भामट्यांनी त्यांना बनावट लिंक पाठवून बँक खात्यांतील रक्कम लंपास केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोखरण रोड क्रमांक १ परिसरात राहणारे रत्नाकर बट्टापाडी (७७) यांना २५ ऑक्टोबरला महानगर गॅस कंपनीच्या नावाने पत्र मिळाले होते. त्यामध्ये मोबाईल क्रमांक आणि ई-मेल अद्ययावत करण्याबाबत सूचना होत्या. यासंदर्भात पत्रावरील क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर १ नोव्हेंबरला एका व्यक्तीने महानगर गॅस कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांना लिंक पाठवली. नावात बदल करण्यासाठी १३ रुपये भरण्यास सांगण्यात आले. बट्टापाडी यांनी लिंक उघडून प्रथम कॅनरा बँक आणि त्यानंतर कर्नाटक बँकेच्या डेबिट कार्डची माहिती भरली. मात्र, व्यवहार पूर्ण न झाल्याचे भासवण्यात आले. त्यांनी ओटीपी कोणालाही न सांगता फोन बंद केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या दोन्ही खात्यांतून अनुक्रमे सहा लाख ३४ हजार ५०८ रुपये आणि २३ हजार ७८८ रुपये असे एकूण सहा लाख ५८ हजार २९६ रुपये काढल्याचे संदेश आले. त्यानंतर त्यांनी सायबर तक्रार नोंदवली असून, दोन अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधणाऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे.

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Maharashtra Live News: "उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनील तटकरेंनीच दादांचा घात केला"; रामदास कदमांच्या विधानामुळे महायुतीत खळबळ

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT