मुंबई

केसांच्या तेलाचा ५० लाखांचा साठा जप्त

CD

केसांच्या तेलाचा ५० लाखांचा साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : ‘टक्कल असलेल्या व्यक्तींना पुन्हा केस उगवतील,’ असा दावा करत समाजमाध्यमांवरून विक्री करण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक हेअर ऑइलचा तब्बल ५० लाख ३४ हजार ९६० रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जप्त केला आहे. नाशिकमधील एका ब्युटी सलूनवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

विशेष म्हणजे, या तेलाच्या बाटल्यांवरील लेबलवर उत्पादकाचे नाव, पत्ता आणि उत्पादन परवाना क्रमांकच नमूद नसल्याचे उघड झाले आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरून ‘व्हीएस हेअर ग्रोथ ऑइल’ची जाहिरात करून टक्कल असलेल्या व्यक्तींना केस उगवण्याचे प्रलोभन दाखले जात असल्याची माहिती एफडीएच्या नाशिक कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ५) नाशिकमधील कॉलेज रोड परिसरातील सहजीवन कॉलनी, विसे मळा येथील रुपल अपार्टमेंटमधील मे. व्ही. एस. न्यू फॅशन झोन या ब्युटी सलूनवर छापा टाकला. या वेळी सलूनचा मालक योगेश भगत याच्याकडे या उत्पादनाच्या निर्मितीचा परवाना आणि आवश्यक कायदेशीर परवानग्या नसल्याचे आढळले. यामध्ये ५० लाख ३४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या उत्पादनाच्या लेबलवर केवळ ‘मार्केटेड बाय मे. व्ही. एस. न्यू फॅशन झोन, नाशिक’ असा उल्लेख होता. बॅच क्रमांक आणि उत्पादन दिनांक नमूद असला तरी प्रत्यक्ष उत्पादकाचे नाव, पत्ता आणि उत्पादन परवान्याचा तपशील नव्हता, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत हा साठा जप्त करण्यात आला आहे.


भ्रामक जाहिरातींपासून सावध राहा!
टक्कल घालवणे, केस उगवणे किंवा वजन कमी करणे अशा हमखास परिणामांच्या दाव्यांना नागरिकांनी बळी पडू नये, कोणतेही औषध खरेदी करण्यापूर्वी उत्पादकाचे नाव, संपूर्ण पत्ता आणि उत्पादन परवाना क्रमांक तपासावा, अशा प्रकारची संशयास्पद उत्पादने किंवा जाहिराती आढळल्यास एफडीएच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Baba Controversial Statement Row : "ईशनिंदेला माफी नाही, राज्यात पाय ठेवू देणार नाही!"; प्रभू श्रीकृष्णावरील 'त्या' विधानावरून देशात मोठा भडका; दोन दिग्गज नेत्यांमध्ये थेट युद्ध

CBSE Date Sheet 2027: सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा...

Nashik TCS Case: एमआयएम नेते इम्तियाज जलील अधिकृतपणे सहआरोपी; संजय शिरसाटांचा "त्याला तुरुंगात जावेच लागेल" असा थेट घणाघात

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

SCROLL FOR NEXT