मुंबई

मुंबईची परंपरा, संस्कृती जपणाऱ्या मूळ मुंबईकरांना हद्दपार होऊ देणार नाही

CD

मूळ मुंबईकरांना हद्दपार होऊ देणार नाही!
‘बीडीडी’च्या चावीवाटप कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : बीडीडी चाळींसह विविध पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईची पुनर्बांधणी होत असली तरी मुंबईची परंपरा, संस्कृती आणि इतिहास जपणाऱ्या मूळ मुंबईकरांना आणि दीर्घकाळापासून येथे राहत असलेल्यांना मुंबईबाहेर हद्दपार होऊ देणार नाही. त्यांना मुंबईत आहे त्याच ठिकाणी मोठी घरे दिली जातील, अशी ग्वाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प त्याचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून म्हाडाने ना. म. जोशी मार्ग लोअर परळ येथील बीडीडी चाळींच्या जागेवर उभारलेल्या पुनर्वसन इमारतीमधील ५५७ सदनिकांचे आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ११ रहिवाशांना चावीवाटप करण्यात आले. बीडीडीच्या रहिवाशांचे आज दिवाळीच्या मुहूर्तावर हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याने त्यांची दिवाळी गोड होत असल्याचे ते म्हणाले. बीडीडी चाळी म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक चळवळीचे केंद्र आहे. येथे अनेक पिढ्या घडल्या, अनेक अंदोलने उभी राहिली आहेत. त्यामुळे बीडीडीवासीयांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने दशभरापूर्वी घेतला होता. त्यानुसार कोणताही नफा न मिळवता म्हाडाच्या माध्यमातून दर्जेदार घरे आणि चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या वेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशीष शेलार, खासदार मिलिंद देवरा, आमदार सुनील शिंदे, मनीषा कायंदे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते.
...
पोलिसांच्या घराबाबत लवकरच निर्णय
२०११ पर्यंत बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये घरे दिली जाणार आहेत. त्यानंतर तेथे वास्तव्यास आलेल्या पोलिसांना बांधकाम खर्च घेऊन घरे दिली जाणार आहेत, मात्र किमतीमध्ये मोठी तफावत निर्माण होत असल्याने लवकरच ठोस निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
...
नाती, आपुलकी कायम ठेवा ः सुनेत्रा पवार
बीडीडी चाळीतील खोल्या १८० चौरस फुटांच्या होत्या. त्यामध्येची तुमच्या दोन-तीन पिढ्यांनी आपला संसार फुलवला. शेजाऱ्यांशी नाती जपली, आपुलकी ठेवली. त्यामुळे आता तुम्ही चाळीतून प्रशस्त घरात जात असला तरी नाती आणि आपुलकी कायम ठेवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. तसेच ही घरे म्हणजे केवळ चार भिंती नाहीत, तर सर्व सोयीसुविधा असलेल्या सदनिका असल्याचे त्यानी स्पष्ट केले.
...
म्हाडा म्हणजे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची खात्री ः एकनाथ शिंदे
म्हाडाने बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची कमान योग्यपणे सांभाळी आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना वेळेत घरे मिळू लागली असून, २०२९ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. यावरून म्हाडा म्हणजे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची खात्री असे समीकरण झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईचा पुनर्विकास कारायचा असेल, तर समूह पुनर्विकासाला पर्याय नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, रेसकोर्सचे सुमारे १२५ एकराची जागा आणि कोस्टल रोडची १५० एकर जागा असे सुमारे २७५ एकर जागेवर वर्ल्ड क्लास गार्डन निर्माण करण्याचे नियोजन असल्याचे शिंदे म्हणाले.
...
डिसेंबर २०२९ पर्यंत बीडीडीचा पुनर्विकास पूर्ण होणार ः जयस्वाल
नायगाव, ना. म. जोशी मार्ग, वरळी या तिन्ही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामध्ये आतापर्यंत ३,९३३ पुनर्वसन सदनिकांचे वितरण रहिवाशांना करण्यात आले आहे. प्रकल्पातील सर्व पुनर्वसन सदनिकांचे काम डिसेंबर २०२९ पर्यंत काम पूर्ण होईल, असे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. वरळी पुनर्विकास प्रकल्पातील सुमारे १,२०० घरांच्या कामाला थोडा विलंब होणार असून, ते जून २०३० पर्यंत पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Baba Controversial Statement Row : "ईशनिंदेला माफी नाही, राज्यात पाय ठेवू देणार नाही!"; प्रभू श्रीकृष्णावरील 'त्या' विधानावरून देशात मोठा भडका; दोन दिग्गज नेत्यांमध्ये थेट युद्ध

CBSE Date Sheet 2027: सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा...

Nashik TCS Case: एमआयएम नेते इम्तियाज जलील अधिकृतपणे सहआरोपी; संजय शिरसाटांचा "त्याला तुरुंगात जावेच लागेल" असा थेट घणाघात

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

SCROLL FOR NEXT