‘टाटा’चा आणीबाणीच्या काळात मुंबईला अखंडित वीजपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : आणीबाणीच्या काळात मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाल्यास येथील रुग्णालये, मेट्रो सेवा, विमानतळ व डेटा सेंटरचा वीजपुरवठा सुरळीत राहावा, म्हणून टाटा पाॅवरने महालक्ष्मी, साकी आणि मानखुर्द या तीन महत्त्वाच्या ठिकाणी ६० मेगावाॅट क्षमतेची बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली उभारली असून, ती नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहे. याचा ग्रिडची स्थिरता वाढवणे, कमाल वीज मागणीचे अनुकूलन, रिॲक्टिव्ह पॉवर व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयोग होणार आहे.
टाटा पाॅवरकडून मुंबई आणि शहरात जवळपास आठ लाखांहून अधिक ग्राहकांना वीज पुरवली जाते. त्यामुळे आणीबाणीच्या काळात वीज उपलब्ध व्हावी, म्हणून वीज वितरण पायाभूत सुविधांना टाटा पाॅवरकडून बळकटी दिली जात आहे. त्याचाच भाग म्हणून महालक्ष्मी, साकी आणि मानखुर्द येथे प्रत्येकी २० मेगावाॅट क्षमतेची बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीत दिवसभर स्वस्ताची सौरऊर्जा साठवून सायंकाळी वापरता येऊ शकते. त्यामुळे मुंबईच्या वीज नेटवर्कची कार्यक्षमता, लवचिकता आणि स्थैर्य वाढते. या प्रणालीमुळे ऊर्जेचा अधिक कार्यक्षम वापर, वीज खरेदी खर्चाचे अनुकूलन आणि महागड्या पीक अवर्समधील विजेवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.