मुंबई

चारोटी टोलनाक्यावर भेसळयुक्त मावा, हलव्याचा साठा जप्त

CD

चारोटी टोलनाक्यावर मावा, हलव्याचा साठा जप्त
कासा, ता. ७ (बातमीदार) ः अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी टोलनाका परिसरात शुक्रवारी रात्री दोन वाहनांवर कारवाई केली. यात भेसळयुक्त मावा, गोड हलवा आणि मिष्ठान्न असा एकूण १० लाख ८४ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक आयुक्त प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी प्रवासी बसमधून बेकायदा मावा (खवा) वाहतूक होणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार चारोटी टोलनाका परिसरात खासगी प्रवासी बसची तपासणी करण्यात आली. या वेळी बसमध्ये १३३ किलो गोड हलवा आणि २३८ किलो मावा असा एकूण ३७१ किलो पदार्थांचा साठा आढळला. त्याची किंमत ९९ हजार ४०० रुपये असून, तो जप्त करण्यात आला. तसेच याच परिसरात एका वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये ३८८ किलो मावा, एक हजार ८३२ किलो गोड हलवा आणि एक हजार ३६६ किलो मिष्ठान्न असा एकूण तीन हजार ५८६ किलो पदार्थांचा साठा आढळला. या साठ्याची किंमत नऊ लाख ८५ हजार ४० रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Farmer ID: ७/१२ वर नाव नसले तरी मिळणार शेतकरी ओळखपत्र; राज्यातील १.६ लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update: नालासोपाऱ्यात आगीच्या तांडव; दोन गाड्या जळून खाक

SCROLL FOR NEXT