मुंबई

व्यावसायिक शिक्षण कायद्यात बदल!

CD

व्यावसायिक शिक्षण कायद्यात बदल!
प्रवेश शुल्क नियमांत सुधारणांसाठी समिती गठित

मुंबई, ता. ७ : राज्यातील व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया आणि विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांच्या शुल्क नियमनासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेशाचे विनियमन) आणि विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (शुल्काचे विनियमन) अधिनियम, २०१५ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शनिवारी (ता. ७) सात सदस्यीय समिती गठित केली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालय, प्रवेश नियामक प्राधिकरण आणि शुल्क नियामक प्राधिकरण यांनी २०१५च्या अधिनियमात विविध सुधारणा सुचविणारे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. या प्रस्तावांचा तसेच अधिनियमातील अन्य तरतुदींचा सर्वंकष अभ्यास करून सुधारित अधिनियम आणि नियमांचे प्रारूप तयार करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शासनाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र राज्य शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव, प्रवेश नियामक प्राधिकरणाचे सचिव तथा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक, निवृत्त विधी सल्लागार तथा विधी व न्याय विभागाचे माजी सहसचिव डी. पी. गोमारे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव (तंत्रशिक्षण) यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक हे समितीचे सदस्य सचिव असतील. २०१५च्या अधिनियमात तंत्रशिक्षण संचालनालय, प्रवेश नियामक प्राधिकरण आणि शुल्क नियामक प्राधिकरण यांनी प्रस्तावित केलेल्या सुधारणांचा समिती सर्वंकष अभ्यास करणार आहे. तसेच अधिनियमातील इतर तरतुदींचाही आढावा घेऊन आवश्यक बदल सुचविले जाणार आहेत.

मसुदा शासनाला सादर केला जाणार
समितीच्या अभ्यासानंतर सुधारित अधिनियम आणि नियमांचा मसुदा तयार करून तो शासनाकडे सादर करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे. समितीने आपल्या शिफारशींसह सुधारित अधिनियम आणि नियमांचा मसुदा शासनाला १० दिवसांपूर्वी सादर करावा, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update: नालासोपाऱ्यात आगीच्या तांडव; दोन गाड्या जळून खाक

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

SCROLL FOR NEXT