मुंबई

‘सकाळ’च्या ‘अवतरण’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

CD

‘सकाळ’च्या ‘अवतरण’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

‘भूराजकारण’ विषयावर दिवाळी अंक; जगभरातील सत्तासंघर्षांचा वेध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी करणारा आणि विविध पुरस्कारांचा मानकरी ठरलेला ‘सकाळ’ माध्यम समूहाचा ‘अवतरण’ दिवाळी अंक यंदाही वाचकांच्या भेटीला आला आहे. ‘जिओपॉलिटिक्स’ अर्थात ‘भूराजकारण’ हा विषय असलेल्या या अंकाचे प्रकाशन शनिवारी (ता. ७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ‘सकाळ’चे मुख्य संपादक राहुल गडपाले आणि युनिट व्यवस्थापक सुभाष जयस्वाल उपस्थित होते.
जागतिक स्तरावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महासत्तांमध्ये सुरू असलेली स्पर्धा, त्यातून निर्माण होणारे सत्तासंघर्ष आणि त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर होणारे विविधांगी परिणाम यांचा सखोल वेध या अंकातून घेण्यात आला आहे. सामरिक विश्लेषकांच्या अभ्यासपूर्ण लेखांमधून जागतिक घडामोडी, महासत्तांचे हितसंबंध आणि बदलत्या जागतिक समीकरणांचे विश्लेषण करण्यात आले आहे. ‘अवतरण’मध्ये देशविदेशातील अभ्यासक, विचारवंत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषक, तज्ज्ञांनी ‘जिओपॉलिटिक्स’वर महत्त्वाचे भाष्य केले आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रकार निलेश वेदे यांनी अंकासाठी मुखपृष्ठाचे आशयपूर्ण चित्र रेखाटले असून, त्यातून यंदाच्या विषयाची संकल्पना प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. विषयाची वेगळी निवड आणि सखोल आशय ही ‘अवतरण’ दिवाळी अंकाची वैशिष्ट्ये यंदाही कायम आहेत.

अमेरिकेत खळबळ! पत्नीने AIच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट? ChatGPTच्या विरोधात खटला दाखल

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल

Rohit Pathare case : २४ वर्षीय रोहित पठारेला घरातून उचललं, झाडाला बांधून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT