सुरक्षा रक्षकांच्या दक्षतेमुळे महिलेचा जीव वाचला
ठाणे शहर, ता. ७ (बातमीदार) : सुरक्षा रक्षकांच्या दक्षतेमुळे एका ३२ वर्षीय महिलेचा जीव वाचला आहे. रागाच्या भरात या महिलेने ठाण्यातील मासुंदा तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सुरक्षा रक्षकाने तत्काळ याबाबत वरिष्ठांना कळवून पुढील हालचाली करून महिलेचा जीव वाचवला. या महिलेला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांनी तिला ठाणे महापालिकेच्या बेघर केंद्रात ठेवले आहे. ही महिला न्यायाधीशांची घटस्फोटित पत्नी असल्याचे समजते.
मासुंदा तलाव परिसरात उदय शिंदे आणि समाधान केंगार हे सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत होते. शुक्रवारी (ता. ६) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तलवाचे गेट बंद करीत असताना त्यांना आतमध्ये एक महिला बसलेली दिसली. त्यांनी तिला बाहेर येण्यास सांगितले असता, तिने थेट तलावात उडी मारून पोहत तलावाच्या मध्यभागातील देवळात गेली. त्यानंतर तेथून तिने किनारा गाठण्याचा प्रयत्न केला, मात्र दम लागल्याने ती कारंजावर बसली. ही बाब सुरक्षा रक्षकांनी त्यांचे वरिष्ठ रणजित पाटील यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी अग्निशमन दल, एनडीआरएफ, नौपाडा पोलिसांच्या मदतीने तिला सुखरूप बाहेर काढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.