मुंबई

मुरबाड तालुक्यात भेंडी लागवडीचा हंगाम जोमात

CD

मुरबाडच्या भेंडीला परदेशी बाजारपेठेची पसंती
लागवडीचा हंगाम जोमात; शेतकऱ्यांकडून मशागतीला वेग

मुरबाड, ता. ८ (वार्ताहर) : मुरबाड तालुक्यातील भेंडीला स्थानिक बाजारपेठेसह परदेशातही मागणी असल्याने यंदाच्या हंगामासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. तालुक्यात भेंडी लागवडीच्या कामांना वेग आला असून, शेतांमध्ये मशागत, वाफे तयार करणे आणि बियाणे पेरणीची कामे सुरू झाली आहेत. निर्यातीमुळे या पिकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

आंबळे, शिवळे, सरळगाव, टोकावडे, मढ, सिंगापूर, धसई, सोनावळे आणि पळू यांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या काही शेतांमध्ये पेरणी पूर्ण झाली असून, काही ठिकाणी रोपे उगवू लागली आहेत. दर्जेदार बियाणे, खत व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि कीड नियंत्रणावर शेतकरी भर देत आहेत.

मुरबाडच्या भेंडीला मुंबई, ठाणे, कल्याणसह प्रमुख बाजारपेठांमध्ये मागणी आहे. निर्यातीच्या माध्यमातून परदेशातही या भेंडीला स्थान मिळत असल्याने या पिकातून आर्थिक उत्पन्नाची चांगली संधी निर्माण झाली आहे.

मात्र, बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्चात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा आहे. कृषी विभागाचे आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन, दर्जेदार बियाणे आणि निर्यातीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास भेंडी उत्पादनाला आणखी चालना मिळू शकते.

भेंडीची वैशिष्ट्ये
- मुंबई, ठाणे, कल्याणच्या बाजारपेठेत मागणी
- परदेशातही निर्यातीद्वारे पोहोच
- तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड
- भाजीपाला शेतीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ

Khadakwasla Dam Latest Water Level : खडकवासला धरणसाखळीत 77.80 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 5.56 टीएमसीने घट, चारही धरणांत पाण्याची आवक शून्य

Praful Patel Clarification : '10 नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटणार...' शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीत काय ठरलं? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे होणार का विलीनीकरण?

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update: : पालघरमधील अतिदुर्गम हट्टीपाड्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी; पांडुरंग शिंदेंच्या घरी जाऊन केले लक्ष्मीपूजन

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या शतकामुळे पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

SCROLL FOR NEXT