मुंबई

ढोल-ताशांच्या गजरात ऐरोलीत दिवाळी पहाट रंगली

CD

ढोल-ताशांच्या गजरात दिवाळी पहाट
ऐरोलीतील निराधार महिला, सफाई कर्मचारी, अनाथ मुलांना भेट

वाशी, ता. ८ (बातमीदार) : भक्तिगीतांचे सूर, मराठमोळ्या गाण्यांची मैफल आणि ढोल-ताशांचा गजर अशा उत्साही वातावरणात ऐरोलीकरांनी दिवाळी पहाट सोहळ्याचा आनंद लुटला. ममित चौगुले युवा प्रतिष्ठानच्या वतीने नगरसेवक ममित चौगुले यांच्या पुढाकाराने रविवारी (ता. ८) ऐरोली सेक्टर ८ मधील श्रीमती मंगला नारायण रायकर चौकात ‘दिवाळी पहाट २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिवसेनेचे उपनेते तथा नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि रायकर चौकातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिशिल्पाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर भक्तिगीते आणि मराठमोळ्या गीतांच्या सादरीकरणाने पहाटेचे वातावरण सुरेल झाले. तरुणाईच्या ढोल-ताशा पथकाने सादर केलेल्या वादनामुळे कार्यक्रमात उत्साहाची भर पडली.

दिवाळीचा आनंद समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने निराधार महिला, सफाई कर्मचारी आणि अनाथ मुलांना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमामुळे ऐरोलीतील दिवाळी पहाटेला सामाजिक उपक्रमाची जोड मिळाली.

आरोग्य प्रश्न सोडविण्याचा मानस
दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांनी एकत्र यावे, सणाचा आनंद सामूहिकपणे साजरा करावा आणि वंचित घटकांनाही आनंदात सहभागी करून घ्यावे, हा कार्यक्रमामागील उद्देश असल्याचे ममित चौगुले यांनी सांगितले. तर विजय चौगुले यांनी ऐरोलीतील नागरिकांसाठी आयुष्मान भारत कार्ड काढण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. नागरिकांच्या शिक्षण आणि आरोग्यविषयक प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Latest Marathi News Live Update: : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली आनंददायी दिवाळी; 'नंदनवन' बंगल्यावर फराळ वाटप करत दिल्या शुभेच्छा

Siddi Community Marathi Song Viral Video : आफ्रिकन लूक अन् अस्सल मराठी गावरान ठसका; माठावर ठेका धरत सिद्दी तरुणांनी गायले ‘हिरो होंडा’ गीत

SCROLL FOR NEXT