मुंबई

पीजीआयएमएसच्या अधिष्ठात्यांना महिन्याला १.८५ लाख मानधन

CD

अधिष्ठात्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

कंत्राटी नियुक्तीच्या प्रस्तावाला महासभेची मंजुरी

कोपरखैरणे, ता. ८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या (पीजीआयएमएस) कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. या नियुक्तीनुसार अधिष्ठात्यांना दरमहा एक लाख ८५ हजार रुपये ठोक मानधन देण्यात येणार आहे.

महापालिकेची पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था सुरू झाली असून, तिचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज सुरळीत चालविण्यासाठी पूर्णवेळ अधिष्ठात्यांची आवश्यकता आहे, मात्र कायमस्वरूपी नियुक्ती होण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत संस्थेचे कामकाज प्रभावित होऊ नये, यासाठी प्रशासनाने कंत्राटी नियुक्तीचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने अधिष्ठात्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या नियुक्त्या ३६४ दिवसांच्या कालावधीसाठी करण्यात येणार असून, त्यानंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड ठेवण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ५३ (१) अन्वये ही नियुक्ती केली जाणार आहे, मात्र निर्धारित मुदत पूर्ण होण्यापूर्वी संबंधित पदावर कायमस्वरूपी प्राध्यापक किंवा अधिष्ठात्यांची नियुक्ती झाल्यास कंत्राटी नियुक्ती आपोआप संपुष्टात येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या १४ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या अधिसूचनेनुसार वैद्यकीय महाविद्यालयांतील अधिष्ठाता, प्राचार्य, संचालक, शिक्षक आणि वैद्यकीय अधीक्षक या पदांसाठी नियुक्तीची कमाल वयोमर्यादा ७० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. कंत्राटी नियुक्ती करताना या निकषांचाही विचार करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पीजीआयएमएसच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाला स्थैर्य मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Latest Marathi News Live Update: : पार्थ पवारांची शरद पवारांसोबत तब्बल दोन ते अडीच तास महत्त्वपूर्ण बैठक; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान भेटीने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

SCROLL FOR NEXT