मुंबई

बहिरीनाथ सोहळ्याने दिवाळे कोळीवाड्यात आनंद

CD

तुर्भे, ता. ८ (बातमीदार) : आधुनिक नवी मुंबईच्या झगमगाटातही आपल्या पूर्वजांनी जपलेली संस्कृती, परंपरा आणि गावपणाची ओळख अभिमानाने जतन करणारा दिवाळे कोळीवाडा आजही श्री बहिरीनाथाच्या आगळ्यावेगळ्या पालखी सोहळ्यामुळे ओळखला जातो. वर्षभर समुद्रात विराजमान असलेल्या बहिरीनाथांना दिवाळीच्या निमित्ताने आज (ता. ८) गावात आणण्यात आले.

सुमारे २०० ते २५० वर्षांपासून सुरू असलेल्या या सोहळ्याचे गावातील ज्येष्ठांकडून सांगितले जाणारे वैशिष्ट्य म्हणजे समुद्राशी जोडलेली श्रद्धा आणि ती श्रद्धा पिढ्यान्‌पिढ्या अखंडपणे जपणारे तांडेल कुटुंबीय! सहा पिढ्यांपासून देवसेवा, धार्मिक विधी आणि परंपरेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या कुटुंबाने बहिरीनाथाच्या सोहळ्याला केवळ धार्मिक स्वरूप दिले नाही, तर गावाच्या सांस्कृतिक अस्मितेचा आणि एकजुटीचा अमूल्य वारसा म्हणून जतन केले आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी गावातील ३०० हून अधिक स्थानिक ग्रामस्थ सुमारे ३५ ते ४० होड्यांमधून घारापुरी बेटाजवळील समुद्रात जातात. या वेळी तांडेल कुटुंबातील पुरुष समुद्रात बुडी मारून देवाची मूर्ती शोधून काढतो. मूर्ती सापडल्यानंतर तिला विधिवत स्नान घालून शेंदूरलेपन केले जाते आणि होडीत विराजमान करून वाजतगाजत दिवाळे कोळीवाड्यातील देवघरात आणले जाते.

दिवाळे कोळीवाड्यातील श्री बहिरीनाथाच्या सोहळ्याची परंपरा सांगताना तांडेल कुटुंबीयांचे योगदान विशेषत्वाने अधोरेखित होते. गावातील ज्येष्ठांच्या माहितीनुसार, पूर्वी ‘गण तांडेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घराण्याची ओळख कालांतराने ‘तांडेल’ कुटुंबीय अशी रूढ झाली. यांना देवघरसुद्धा या नावाने ओळखले जाते. या घराण्याने बहिरीनाथाप्रति असलेली श्रद्धा, निष्ठा आणि सेवाभाव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला.

या घराण्याची वंशपरंपरा बेमट्या गण तांडेल, बाळा बेमट्या गण तांडेल, नागा आणि जोमा बाळा गण तांडेल, शनिवार, नामदेव व कृष्णा नागा तांडेल, नारायण जोमा तांडेल आणि सध्या एकत्रितपणे ही परंपरा जपणारे तांडेल कुटुंबीय अशा सहा पिढ्यांमध्ये पुढे आली आहे. एका पिढीने जपलेली श्रद्धा पुढील पिढीने जबाबदारी म्हणून स्वीकारली आणि त्या जबाबदारीचे रूपांतर आज एका समृद्ध धार्मिक-सांस्कृतिक परंपरेत झाले.

गावाच्या सामूहिक श्रद्धेची साक्ष
काळानुसार जीवनशैली बदलली, गावाचे रूप बदलले आणि आधुनिकतेने शहराचा चेहरामोहरा बदलला; मात्र बहिरीनाथाच्या सेवेशी जोडलेली तांडेल कुटुंबीयांची नाळ कायम राहिली. पूर्वजांकडून मिळालेला हा वारसा केवळ नावापुरता जतन न करता, त्यामागील श्रद्धा, संस्कार आणि परंपरेचा मान राखण्याचे कार्य या कुटुंबाने केले आहे. त्यामुळे बहिरीनाथाचा सोहळा म्हणजे तांडेल घराण्याच्या सहा पिढ्यांच्या निष्ठेची आणि गावाच्या सामूहिक श्रद्धेची जिवंत साक्ष ठरतो.

Rajasthan Voter List Discrepancy : 30 लाख मतदारांची नावे गहाळ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वादाच्या भोवऱ्यात, SIR प्रक्रियेनंतर दोन याद्यांमध्ये तफावत

U19 IND vs U19 PAK: एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले अन् तिघांकडून भारतीय फलंदाजाचा कॅच सुटला! पाहा Comedy Fielding ड्रामा

Khadakwasla Dam Latest Water Level : खडकवासला धरणसाखळीत 77.80 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 5.56 टीएमसीने घट, चारही धरणांत पाण्याची आवक शून्य

Latest Marathi News Live Update: : पालघरमधील अतिदुर्गम हट्टीपाड्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी; पांडुरंग शिंदेंच्या घरी जाऊन केले लक्ष्मीपूजन

Praful Patel Clarification : '10 नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटणार...' शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीत काय ठरलं? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे होणार का विलीनीकरण?

SCROLL FOR NEXT