मुंबई

जाणीव संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा दीपोत्सव

CD

जाणीव संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा दीपोत्सव; महापौर नितीन पाटील यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी!
खारघर ता. ८ (प्रतिनिधी) ः सण-उत्सवांचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि वंचित घटकांच्याही जीवनात आनंदाचे क्षण फुलावेत, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने खारघरमधील चाफेवाडी आणि फणसवाडी येथील आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमात पनवेल महापालिकेचे महापौर व जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी सहभागी होत आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप केले.
जाणीव एक सामाजिक संस्था सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आहे. याच उपक्रमशीलतेचा भाग म्हणून चाफेवाडी आणि फणसवाडी येथील आदिवासी वस्त्यांमध्ये दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. या वेळी आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. महापौर नितीन पाटील यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या आनंदात सहभाग नोंदविला.
समाजातील प्रत्येक घटकाला सणांचा आनंद अनुभवता यावा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे आणि समाजातील आपुलकीची नाती अधिक दृढ व्हावीत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि रोषणाईचा सण नसून एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा आणि आनंदाची देवाणघेवाण करण्याचा उत्सव आहे. याच भावनेतून संस्थेने हा उपक्रम राबविला. फराळवाटपाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्यात आले.
या उपक्रमावेळी पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती मधुशेठ पाटील, भाजप खारघर शहर मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण पाटील, भाजप पदाधिकारी संजय घरत, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमातून सामाजिक एकोपा आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.

कोट
‘‘दिवाळीचा खरा आनंद इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यात आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सणांचा आनंद पोहोचविण्याचा जाणीव संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद असून, अशा सामाजिक कार्यातून माणुसकी आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ होतो.’’
-नितीन पाटील
महापौर पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Latest Marathi News Live Update: : पार्थ पवारांची शरद पवारांसोबत तब्बल दोन ते अडीच तास महत्त्वपूर्ण बैठक; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान भेटीने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

SCROLL FOR NEXT