कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमातील तंत्र मदतनीस कर्मचाऱ्यांना चुकीऐवजी योग्य वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. परिवहन कामगार कर्मचारी संघटनेने २०१० पासून सरकार दरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत सरकारने शुक्रवारी या संदर्भातील अध्यादेश जारी केला आहे. या निर्णयाचा लाभ एकूण १२ कर्मचाऱ्यांना मिळणार असून, दीर्घकाळापासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तंत्र मदतनीस कर्मचाऱ्यांना चुकीची वेतनश्रेणी लागू करण्यात आल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला होता. संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी २०१० पासून सरकारकडे पत्रव्यवहार आणि विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर सरकारने मागणी मान्य करून वेतनश्रेणीत बदल करण्याबाबत अध्यादेश प्रसिद्ध केला. या यशाचे श्रेय संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. या कामी संघटनेचे उपाध्यक्ष प्रतीक पेणकर, सरचिटणीस शरद जाधव, खजिनदार गुलाब पाटील, श्रीपाद लोखंडे, प्रशांत जावळे, दीपक तुंगारे, गंगाधर राठोड आणि ज्ञानेश्वर गोडसे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.