मुंबई

विहूर मोरीचे प्रथमच पुनर्बांधकाम

CD

विहूर मोरीचे प्रथमच पुनर्बांधकाम
मुरूड-साळाव मार्गावरील ११० वर्षे जुन्या बांधकामाला नवे स्वरूप
मुरूड, ता. ८ (बातमीदार) : मुरूड-साळाव मार्गावरील विहूर येथील नवाबकालीन मोरीचे तब्बल ११० वर्षांनंतर प्रथमच पुनर्बांधकाम सुरू झाले आहे. रविवारी (ता. ८) या कामाला सुरुवात झाली. या मार्गावरील सर्वांत मोठ्या मोरीचे रुंदीकरण करण्यात येत असून, पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासह वाहतुकीची सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे ठरणार आहे.
मुरूड-साळाव या सुमारे ३२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण वेगाने सुरू आहे. या कामांतर्गत जीर्ण आणि अरुंद झालेल्या जुन्या मोरी काढून त्याऐवजी अधिक रुंद मोरी बांधण्यात येत आहेत. विहूर येथील मोरीतून डोंगराच्या चारही बाजूंनी वाहणारे पावसाचे पाणी घनदाट जंगल परिसरातून समुद्राला मिळते. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी या मोरीचे विस्तारीकरण आवश्यक आहे.
नवाबकालीन काळात संपूर्ण दगडांचा वापर करून बांधण्यात आलेली ही मोरी दीर्घकाळाच्या वापरामुळे जीर्ण झाली होती. त्यामुळे आधुनिक पद्धतीने तिचे पुनर्बांधकाम करण्यात येत आहे. याच मार्गावरील कोटेश्वरी मंदिराजवळील जुन्या मोरीचेही नव्याने बांधकाम सुरू आहे.

पावसाळी प्रवाहाला मोकळी वाट
मोरींचे रुंदीकरण आणि रस्त्याचे काँक्रीटीकरण यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. तसेच या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना अधिक सुरक्षित सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Praful Patel Clarification : '10 नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटणार...' शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीत काय ठरलं? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे होणार का विलीनीकरण?

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

Latest Marathi News Live Update: : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली आनंददायी दिवाळी; 'नंदनवन' बंगल्यावर फराळ वाटप करत दिल्या शुभेच्छा

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT