अंबरनाथ, ता. ८ (वार्ताहर) : सण-उत्सवांच्या काळात वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेने २४ तास तक्रार निवारण यंत्रणा सुरू केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या निर्देशानुसार नगर परिषद कार्यालयात स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन २४ तासांच्या आत प्राथमिक कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांना ८७९३४७१९७४ या २४ तास उपलब्ध असलेल्या क्रमांकावर किंवा १८००२३३११०६ या विनाशुल्क क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल. तसेच chiefofficerambarnath@gmail.com या ई-मेलवरही तक्रार पाठविता येणार आहे. सार्वजनिक रस्ते, गल्ली, पदपथ आणि चौकांमध्ये फटाके फोडण्यास मनाई आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यांसारख्या अधिसूचित शांतता क्षेत्राच्या १०० मीटर परिसरात ध्वनीक्षेपक किंवा फटाक्यांचा वापर करणे नियमबाह्य आहे. याशिवाय १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणारे फटाके तसेच सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी न घेता ध्वनिवर्धक यंत्रणा किंवा ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास मनाई आहे. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी तक्रार नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.