मुंबई

नव्या स्थानकांसाठी तटकरे प्रयत्नशील

CD

नव्या स्थानकांसाठी तटकरे प्रयत्नशील
खारपाडा, गडब-आमटेमसह रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
पेण, ता. ८ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील खारपाडा आणि गडब-आमटेम येथे नवीन रेल्वे स्थानके सुरू करण्यासह रायगड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांचा पाठपुरावा खासदार सुनील तटकरे करीत आहेत. यासंदर्भात ६ नोव्हेंबरला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला.
या बैठकीत खारपाडा स्थानकाचा बी श्रेणी स्थानक म्हणून अंदाजपत्रकात समावेश करण्याबाबत चर्चा झाली. गडब-आमटेम येथील नागरिकांची गरज लक्षात घेऊन नवीन स्थानक उभारण्याचा विषयही मांडण्यात आला. याशिवाय हमरापूर रेल्वे स्थानकातील तिकीटघर दोन महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
रोडे-काश्मिरे गावाची लोकसंख्या सुमारे तीन ते चार हजार असून, तेथील नागरिकांसाठी असलेला रेल्वे बोगदा मोठ्या वाहनांच्या वाहतुकीस अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे रेल्वे रुळालगतचा पर्यायी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. पेण स्थानकावरील एका फलाटावर जाण्यासाठी होणारी अडचण दूर करण्यासाठी मागील बाजूस पादचारी मार्ग उभारण्याचा विषयही चर्चेत आला.
पेण, रोहा, नागोठणे आणि कर्जत परिसरातील रेल्वेच्या अन्य समस्यांवरही बैठकीत चर्चा झाली. मागील बैठकीत मांडलेल्या विषयांचा पाठपुरावा करण्यावर भर देण्यात आला.

प्रवाशांच्या अडचणींचा आढावा
या बैठकीला रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधाकर घारे, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, किशोर जैन, भाई टक्के आणि पेण तालुकाध्यक्ष दयानंद भगत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Latest Marathi News Live Update: : पार्थ पवारांची शरद पवारांसोबत तब्बल दोन ते अडीच तास महत्त्वपूर्ण बैठक; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान भेटीने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

SCROLL FOR NEXT