मुंबई

मुंब्र्यात ५८ किलो बनावट तूपसदृश पदार्थ जप्त

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : डालडा आणि पामतेलाचे मिश्रण करून त्याची बनावट तूप म्हणून विक्री करणाऱ्या व्यावसायिकाचा मुंब्रा पोलिसांनी पर्दाफाश केला. वीर सावरकरनगर येथील त्रिमूर्ती इमारतीतील एका खोलीत सुरू असलेल्या या प्रकारावर पोलिस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुमारे ४० हजारांचा ५८ किलो बनावट तूपसदृश पदार्थ जप्त करण्यात आला.

मुंब्रा पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाला शुक्रवारी (ता. ६) दुपारी बनावट तूप तयार करून विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीत संबंधित खोलीची तपासणी केली. तेथे मनोज साहू हा डालडा आणि पामतेलाचे मिश्रण करून तूपसदृश पदार्थ तयार करताना आढळला. तपासणीदरम्यान दोन मोठे हंडे, तेलाचे रिकामे डबे, वजनकाटा तसेच विक्रीसाठी एक किलोच्या चार पिशव्यांमध्ये भरलेला मिश्रित पदार्थ आढळला. या पदार्थाच्या निर्मिती व विक्रीसाठी आवश्यक अन्न सुरक्षा नोंदणी किंवा परवाना संबंधित व्यक्तीकडे नव्हता. पदार्थाच्या गुणवत्तेबाबत आणि भेसळीबाबत संशय आल्याने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तो साठा ताब्यात घेतला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Latest Marathi News Live Update: : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली आनंददायी दिवाळी; 'नंदनवन' बंगल्यावर फराळ वाटप करत दिल्या शुभेच्छा

Siddi Community Marathi Song Viral Video : आफ्रिकन लूक अन् अस्सल मराठी गावरान ठसका; माठावर ठेका धरत सिद्दी तरुणांनी गायले ‘हिरो होंडा’ गीत

SCROLL FOR NEXT