सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाण्यात जुन्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर काही रहिवासी अडकले होते. अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलिसांनी संयुक्त बचावकार्य करत नऊ रहिवाशांची सुटका केली. हा प्रकार वर्तकनगर येथील शिवाईनगर परिसरातील गणराज सोसायटी या २४ वर्षे जुन्या इमारतीत घडल्याने परिसरात खळबळ उडाली.
एकीकडे दिवाळी पहाटेच्या आनंद दिवाळी साजरी होत असताना, दुसरीकडे रविवारी (ता. ८) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गजानन महाराज मठाशेजारील गणराज सोसायटीमध्ये स्लॅब कोसळल्याची घटना घडली. ही इमारत चार मजल्यांची असून, स्लॅब कोसळल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील रहिवासी अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, टीडीआरएफचे पथक, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि वर्तकनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
महापालिकेच्या दोन रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या. संबंधित पथकांनी संयुक्तपणे बचावकार्य राबवत अडकलेल्या नऊ रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये सूर्यकांत घाग (वय ७०), सुधा घाग (६५), दीप्ती घाग (४०), वेद घाग (१८), प्रदीप गराटे (५२), प्रगती गराटे (४९), प्रसाद गराटे (२६), सरीस चौधरी (४६) आणि दत्ता (७६) यांचा समावेश असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.