मुंबई

डांबर दरवाढीचा कंत्राटदारांना लाभ

CD

डांबर दरवाढीचा कंत्राटदारांना लाभ
रस्त्यांच्या कामांसाठी वाढीव मोबदला देण्यास विशेष सभेची मंजुरी
पनवेल, ता. ८ (बातमीदार) : जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराच्या दरात झालेली वाढ लक्षात घेऊन पनवेल महापालिकेने रस्ते दुरुस्ती आणि नूतनीकरणाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग समिती अ, ब, क आणि ड अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामांमधील डांबर दरवाढीचा फरक अदा करण्याच्या प्रस्तावाला विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल पूर्व व पश्चिम आणि काळुंद्रे परिसरातील रस्ते दुरुस्तीची कामे २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी वार्षिक दराने देण्यात आली होती. तसेच राज्य शासनाच्या २०२३-२४ मधील मूलभूत सोयी-सुविधांच्या विशेष तरतुदीतून पनवेल शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि पावसाळी गटारांची कामे करण्यात आली.
या कामांसाठी एमपीएम, टॅक कोट, डीबीएम आणि बीसी या डांबरी मिश्रणांचा वापर झाला. दरम्यान, डांबराच्या किमतीत वाढ झाल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १७ एप्रिल २०२६ रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार १ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीतील दरवाढीचा फरक मिळावा, अशी मागणी कंत्राटदारांनी केली होती. सभेच्या मंजुरीमुळे त्यांना वाढीव रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दर्जावर नियंत्रण आवश्यक
पनवेल शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे लवकर बुजवून कामे तातडीने सुरू करावीत. महापालिका अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली कामांचा दर्जा उत्तम राखावा, अशी मागणी नगरसेवक सुमित झुंजारराव यांनी केली. दरवाढीचा मोबदला देताना नागरिकांना पुन्हा खड्ड्यांचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Latest Marathi News Live Update: : शरद पवारांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 'सिल्वर ओक'वर जाणार; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटीची मालिका सुरू

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

SCROLL FOR NEXT