मुंबई

दुष्काळी शेतकऱ्यांच्या बांधावर वनमंत्री

CD

दुष्काळी शेतकऱ्यांच्या बांधावर वनमंत्री
शहापूरच्या करपटवाडीत पीक नुकसानीची पाहणी
शहापूर, ता. ८ (वार्ताहर) : अल्प पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी रविवारी शहापूर तालुक्यातील ढाढरे गावाच्या हद्दीतील करपटवाडी येथे भेट दिली. या वेळी त्यांनी भात, नाचणी, उडीद, खुरासणी आणि तीळ पिकांच्या नुकसानीची पाहणी करून आदिवासी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना दिवाळी शेतकऱ्यांसोबत त्यांच्या घरी साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नाईक यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

शहापूर तालुक्यात अल्प पर्जन्यमानामुळे भात, नागली, वरई, उडीद, खुरासणी, तीळ आणि तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली होती, मात्र या मागणीला अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने मंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या वेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, गटविकास अधिकारी बी. एच. राठोड, कृषी अधिकारी कुमार जाधव आदी उपस्थित होते.

पीक नुकसानीची भरपाई, थेट आर्थिक अनुदान, आपत्कालीन निधी आणि कृषिपूरक उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बळीराजा एकटा नसून शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही गणेश नाईक यांनी या वेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Siddi Community Marathi Song Viral Video : आफ्रिकन लूक अन् अस्सल मराठी गावरान ठसका; माठावर ठेका धरत सिद्दी तरुणांनी गायले ‘हिरो होंडा’ गीत

Nagpur Earthquake Latest Update : नागपूर जिल्ह्यात 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप! तुमच्या भागात जाणवले का धक्के? किती झाले नुकसान?

Latest Marathi News Live Update: : पार्थ पवारांची शरद पवारांसोबत तब्बल दोन ते अडीच तास महत्त्वपूर्ण बैठक; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान भेटीने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष

U19 Asia Cup: IND vs PAK सामन्यात ड्रामा! नॉ-बॉलवर भारतीय फलंदाजाला आऊट दिलं? यशवर्धनच्या विकेटवरून वाद

SCROLL FOR NEXT