मुंबई

हटडी व्यवसायाला घरघर

CD

हटडी व्यवसायाला घरघर
पाच हजार वर्षांचा सांस्कृतिक वारसा धोक्यात
उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : दिवाळीच्या प्रकाशात सिंधी संस्कृतीची परंपरा उजळवणाऱ्या ‘हटडी’ कारागिरांच्या आयुष्यात मात्र आर्थिक संकटाचा अंधार पसरला आहे. पिढ्यान्‌पिढ्या हा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या गुजरातमधील वाघरी समाजाच्या कारागिरांना मेहनतीच्या तुलनेत योग्य मोबदला मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि तुटपुंजा नफा यामुळे पुढील वर्षापासून हा पारंपरिक व्यवसाय बंद करण्याचा विचार कारागिरांकडून केला जात आहे.

सिंधी समाजाच्या दिवाळी उत्सवात लक्ष्मीपूजनाबरोबरच ‘हटडी’ पूजनाला विशेष महत्त्व आहे. व्यापारवृद्धी, सुखसमृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या परंपरेचे नाते सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या मोहेंजोदडो संस्कृतीशी जोडले जाते. सिंधी भाषेत ‘हट’ म्हणजे दुकान. नवजात बालकाच्या पहिल्या दिवाळीत त्याच्या नावाने हटडी स्थापन करून पूजन करण्याची प्रथाही समाजात आजही प्रचलित आहे.

ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी गुजरातमधील मेंशन गावातील वाघरी समाजाचे कारागीर दरवर्षी दिवाळीच्या दोन महिने आधी उल्हासनगरात दाखल होतात. माती, शेण, लाकडी पट्ट्या, बांबू, चुना आणि रंगीत कागदांचा वापर करून ते विविध आकारांच्या आकर्षक हटड्या तयार करतात, मात्र त्यांच्या कष्टाला अपेक्षित आर्थिक परतावा मिळत नसल्याची खंत आहे.

कारागीर रोहन दीपक उगरेच यांनी सांगितले की, त्यांचे आजोबाही अनेक दशकांपूर्वी हा व्यवसाय करण्यासाठी उल्हासनगरात येत होते. गेल्या १० वर्षांपासून ते स्वतः ही परंपरा पुढे नेत आहेत. सध्या छोटी हटडीची जोडी १०० रुपये, मध्यम आकाराची १५० ते २५० रुपये, तर मोठी जोडी ५०० रुपयांपर्यंत विकली जाते. साहित्याचा वाढता खर्च आणि मेहनतीच्या तुलनेत मिळणारा कमी नफा यामुळे व्यवसाय परवडेनासा झाला आहे.

कारागीर अजय राजेश वीर यांनी पुढील वर्षापासून हा व्यवसाय बंद करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. संभाजी चौक ते भाटिया चौक मार्ग, कॅम्प दोनमधील टेलिफोन एक्स्चेंज परिसर तसेच छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाखाली हे कारागीर अहोरात्र हटड्या तयार करत आहेत. शॉपकीपर असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी कारागिरांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर सिंधी समाजाचा हा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लोप पावण्याची भीती व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Diwali Celebration: सिंहगडावर दिवाळी पहाटेचा अनोखा दीपोत्सव! कल्याण दरवाजात मशालींची रोषणाई, तानाजी मालुसरेंच्या समाधीवर दीपज्योती

Rajasthan Voter List Discrepancy : 30 लाख मतदारांची नावे गहाळ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वादाच्या भोवऱ्यात, SIR प्रक्रियेनंतर दोन याद्यांमध्ये तफावत

U19 IND vs U19 PAK: एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले अन् तिघांकडून भारतीय फलंदाजाचा कॅच सुटला! पाहा Comedy Fielding ड्रामा

Latest Marathi News Live Update: : "आमदारांचे वेतन बंद करा, पण दिव्यांगांचे मानधन ५ ते १० हजारांपर्यंत वाढवा"; अमरावतीच्या कार्यक्रमात आमदार रवी राणांची आक्रमक मागणी

Khadakwasla Dam Latest Water Level : खडकवासला धरणसाखळीत 77.80 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 5.56 टीएमसीने घट, चारही धरणांत पाण्याची आवक शून्य

SCROLL FOR NEXT