शिरवणे विद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती
नेरूळ, ता. ९ (बातमीदार) ः शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेज, नेरूळ यांच्या वतीने शिरवणे विद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती करण्यात आली. विद्यालयाचे अध्यक्ष तथा भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी बोलताना राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाची जाणीव निर्माण करून पाणीबचतीचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. पाणी हे निसर्गाचे मानवाला दिलेली अत्यंत अनमोल भेट आहे. मानव अन्न शिवाय काही दिवस जगू शकतो, पण पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. म्हणूनच पाणी हेच जीवन आहे, परंतु आजच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि बदलत्या हवामानामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी पाणी जपा, पाणी वाचवा हा केवळ एक नारा न राहता, प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी बनणे गरजेचे असल्याचे डॉ. राजेश पाटील म्हणाले.
पाणी वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, पाण्याचा अपव्यय टाळणे, नळ उघडे न ठेवणे, पावसाच्या पाण्याचे संकलन करणे तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे.
पाणीही निसर्गाने दिलेले अनमोल वरदान असून, त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेशदेखील डॉ. राजेश पाटील यांनी या वेळी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना दिला. या कार्यक्रमाला शाळेच्या प्रा. भाग्यश्री चौधरी व सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.