मुंबई

ग्रामीण भागात लोकसंस्कृती आजही जिवंत!

CD

मुरबाड, ता. ९ (वार्ताहर) : आधुनिकतेच्या युगात अनेक पारंपरिक सण, उत्सव आणि लोकसंस्कृती हळूहळू लोप पावत असताना मुरबाड तालुक्यात दीपावलीची लोकसंस्कृती आजही मोठ्या उत्साहात जपली जात आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील गाव-वाड्यांमध्ये दीपावलीनिमित्त पशुधनाला आकर्षक पद्धतीने सजवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आजही कायम आहे.

दीपावली पाडव्याच्या दिवशी पशुधनाला विशेष महत्त्व दिले जाते. शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या जनावरांना विविध रंग, फुले, जंगलातील नैसर्गिक वस्तू, पाने, फांद्या आणि उपलब्ध सजावटीच्या साहित्याचा वापर करून सुंदररीत्या सजवले जाते. गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व जण या परंपरेत सहभागी होतात. या परंपरेतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील मोकळ्या जागेवर गवताचा पेंडा किंवा भाताच्या पेंढ्याचा ढीग रचून त्यावर पारंपरिक पद्धतीने अग्नी प्रज्वलित केला जातो. त्यानंतर सजवलेल्या गाई, म्हशी, बैल आणि इतर जनावरांना त्या अग्नीजवळून किंवा त्यावरून पारंपरिक पद्धतीने नेले जाते. या विधीला स्थानिक लोकपरंपरेत विशेष महत्त्व असून, पिढ्यान्‌पिढ्या ही प्रथा श्रद्धेने पाळली जात आहे.

तालुक्यातील पारदवाडी, केव्हावाडी, मोहोवाडी, बनाचीवाडी, कुडशेत, झाडघर, मोदलवाडी, कुंडाचीवाडी, पेजवाडी, उंबरवाडी, वाकलवाडी यांसह अनेक आदिवासीवाड्यांमध्ये ही परंपरा आजही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. याशिवाय तालुक्यातील इतर ग्रामीण भागातही अशाच प्रकारे जनावरांची सजावट करून दीपावलीचा आनंद साजरा केला जातो.

परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न
काळाच्या ओघात शेतीचे स्वरूप बदलले असून, पशुधनाची संख्याही पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे, मात्र गावांमध्ये शिल्लक असलेल्या जनावरांना सजवून ही परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न ग्रामस्थांकडून केला जात आहे. नव्या पिढीपर्यंत आपल्या पूर्वजांच्या परंपरा, संस्कृती आणि ग्रामीण जीवनातील पशुधनाचे महत्त्व पोहोचवण्याचे काम या माध्यमातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Mumbai Airport: मुंबईतून परदेशात जाणाऱ्या 'त्या' प्रवाशांना आता नवी मुंबई गाठावी लागणार? १२ कंपन्यांचा विरोध का?

Maharashtra Live News: जालना जिल्ह्यातील भिलपुरी गावात पोहोचले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vivekanand Patil Gokul Politics : आम्हाला चोरमन नको, आमच्या हक्काचा चेअरमन हवा; गोकुळच्या मोर्चात विवेकानंद पाटील यांची आक्रमक तोफ धडाडली

SCROLL FOR NEXT