ठाणे, ता. ९ : दिवाळीच्या उत्सवात आगीच्या घटना समोर येत असताना, दुसरीकडे सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात ठाणे शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वागळे इस्टेट आणि राबोडी या परिसरात रात्रीच्या गस्तीवेळी सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील काही जण पोलिसांना पाहताच पसार झाले.
वागळे इस्टेट परिसरात २२ नंबर सर्कल येथे प्रताप धर्मेंद्र सिंह (वय २८) आणि शिवम जयनारायण गुप्ता (२६) हे रस्त्यावर फटाके फोडताना आढळले. ज्ञानेश्वरनगर चौकात स्वप्नील नंदकुमार टुकरूल (३१), कल्पतरू चौकात धीरज प्रदीप काळे (१८), तर इंदिरानगर नाका येथे मनीष लालासो महारुगडे (२२) आणि सुमित विनोद यादव (१८) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिनाताई ठाकरे चौक आणि वृंदावन बस थांबा परिसरातही सार्वजनिक रस्त्यावर फटाके फोडणारे प्रत्येकी दोन जण पोलिसांच्या निदर्शनास आले, मात्र पोलिसांना पाहताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शोध घेतला; परंतु ते हाती लागले नाहीत. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासह नागरिकांच्या जीविताला धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गस्त वाढवून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.