मुंबई

दिवाळीच्या रोषणाईला आगीचे गालबोट

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : दिव्यांचा झगमगाट, फटाक्यांचा धडाका आणि उत्सवाचा जल्लोष सुरू असताना ठाणे शहराला आगीच्या घटनांचे चटके बसले. १ ते ८ नोव्हेंबरदरम्यान शहरात तब्बल ३० ठिकाणी आग लागल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे मागील तीन दिवसांत आगीच्या घटनांची वाढ झाली आहे. या कालावधीत १८ ठिकाणी आग लागली, तर ८ नोव्हेंबरला एकाच दिवसात आठ घटनांनी अग्निशमन यंत्रणेची धावपळ उडवली.

दिवाळी म्हटली की घराघरात रोषणाई, आकर्षक विद्युत सजावट आणि फटाक्यांची आतषबाजी आलीच. याच उत्साहात सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास आनंदाच्या सणावर संकट ओढवू शकते, हे ठाण्यातील घटनांनी अधोरेखित केले. गॅलरी, खिडक्या आणि इमारतींच्या परिसरात केलेली सजावट, विद्युत दिव्यांची जोडणी तसेच आकाशात सोडले जाणारे रॉकेट यांमुळे आग लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या नोंदीनुसार, १ नोव्हेंबरला एक, २ नोव्हेंबरला तीन, ३ नोव्हेंबरला एक, ४ नोव्हेंबरला चार आणि ५ नोव्हेंबरला तीन आगीच्या घटना घडल्या. त्यानंतर ६ नोव्हेंबरला सहा, ७ नोव्हेंबरला चार आणि ८ नोव्हेंबरला आठ घटनांची नोंद झाली. आठ दिवसांतील ही संख्या ३० वर पोहोचल्याची माहिती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांनी दिली.

दिवाळीचा अखेरचा टप्पा ठरला धोकादायक
आगीच्या घटनांची आकडेवारी पाहता धोका अधिक वाढल्याचे चित्र आहे. ६ ते ८ नोव्हेंबर या तीन दिवसांत १८ घटना घडल्या. एकूण घटनांपैकी ६० टक्के घटना याच तीन दिवसांत घडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Maharashtra Live News: मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; मेढ्यात भाजप कार्यकर्ते व नागरिकांचा भव्य मोर्चा, कठोर कारवाईचा इशारा

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT