मुंबई

सूर आणि शब्दांची अनोखी प्रभात

CD

सूर आणि शब्दांची अनोखी प्रभात
पनवेलमध्ये ‘दिवाळी पहाट २०२६’ चा स्वरमयी सोहळा संपन्न
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ : दिवाळीच्या वातावरणात, वडाळे तलावाच्या विहंगम निसर्गरम्य परिसरात सोमवारी (ता. ९) पहाटे पनवेलकरांनी संगीत आणि साहित्याची एक अप्रतिम पर्वणी अनुभवली. पनवेल पालिका आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट २०२६’ या सांस्कृतिक सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि स्वरमय झाला होता. गायिका प्रियांका बर्वे यांच्या सुरेल गायनाने आणि कवी वैभव जोशी यांच्या आशयघन काव्यरचनांनी उपस्थितांना खिळवून ठेवले.
विशिष्ट परंपरेचे सातत्य राखत आयोजित केलेल्या या सोहळ्यात प्रियांका बर्वे यांनी तुझं मागतो मी आता, केव्हा तरी पहाटे, इन आँखों की मस्ती में, मी तर स्वामिनी तुझी ते थेट कानडा राजा पंढरीचा यांसारख्या लोकप्रिय मराठी, हिंदी व भक्तिगीतांची आल्हाददायक उधळण केली. त्यांच्या प्रत्येक तानेला आणि लयीला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. गायकीच्या या सुरेल प्रवासाला कवी व गीतकार वैभव जोशी यांच्या संवेदनशील काव्यपंक्तींची सुरेख झालर लाभली. निसर्ग, जीवनमूल्ये, संस्कृती आणि मानवी भावभावनांचा अनोखा ताणाबाणा विणणाऱ्या त्यांच्या काव्याने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. संगीत आणि साहित्याच्या या दुहेरी संगमाने उपस्थितांना एक समृद्ध सांस्कृतिक अनुभव दिला.
याप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, पनवेल पालिकेचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपायुक्त गणेश शेटे, सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर व हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत ठाकूर व नितीन पाटील यांच्या हस्ते कलाकारांचा विशेष सत्कार करण्यात आला, तर परेश ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Mumbai Airport: मुंबईतून परदेशात जाणाऱ्या 'त्या' प्रवाशांना आता नवी मुंबई गाठावी लागणार? १२ कंपन्यांचा विरोध का?

Maharashtra Live News: जालना जिल्ह्यातील भिलपुरी गावात पोहोचले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vivekanand Patil Gokul Politics : आम्हाला चोरमन नको, आमच्या हक्काचा चेअरमन हवा; गोकुळच्या मोर्चात विवेकानंद पाटील यांची आक्रमक तोफ धडाडली

SCROLL FOR NEXT