मुंबई

वसई शहराला सणासुदीच्या दिवसात कचऱ्याचा विळखा

CD

सणासुदीत वसईत कचऱ्याचे ढीग
दुर्गंधी, अस्वच्छतेने नागरिक त्रस्त

वसई, ता. ९ (बातमीदार) : दिवाळीच्या सणासुदीत वसई शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचल्याने अस्वच्छतेची समस्या गंभीर बनली आहे. तीन दिवसांपूर्वी बोनस न मिळाल्याने सफाई कामगारांनी काम बंद ठेवले होते. त्यानंतर तोडगा निघून काम पुन्हा सुरू झाले असले, तरी साचलेला कचरा उचलण्याचे मोठे आव्हान स्वच्छता यंत्रणेसमोर आहे. बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि निवासी भागांत कचरा साचल्याने दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्या, थर्माकोल, सजावटीचे साहित्य, फुलांचा कचरा, फटाक्यांचे अवशेष आणि उरलेल्या अन्नाचे प्रमाण वाढले आहे. अनेक दुकानदार आणि नागरिक हा कचरा रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत टाकत असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. त्यातच सफाई कामगारांच्या काम बंद आंदोलनामुळे काही दिवस कचरा उचलला गेला नव्हता. त्यामुळे आता साचलेला कचरा हटवण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

सणासुदीच्या काळात कचऱ्याचे प्रमाण वाढले असताना स्वच्छता यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला आहे. परिणामी, अनेक ठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे चित्र आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची आणि साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहराच्या स्वच्छतेबरोबरच सौंदर्यालाही यामुळे बाधा पोहोचत आहे.

ही समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने सणासुदीच्या काळात अतिरिक्त कचरा गाड्या आणि सफाई कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी. नागरिकांनीही कचरा रस्त्यावर न टाकता ओला आणि सुका कचरा वेगळा करून कचराकुंडीत टाकावा. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेसोबत नागरिकांनीही जबाबदारी घ्यावी, अशी अपेक्षा सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, शहरात ज्या ठिकाणी कचरा अधिक प्रमाणात साचला आहे, तेथील कचरा उचलण्यासाठी स्वच्छता यंत्रणा काम करीत आहे. शहरात अस्वच्छता निर्माण होऊ नये याबाबत खबरदारी घेतली जाईल, असे महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी सांगितले.
------------

वसई : शहरात ठिकठिकाणच्या कचऱ्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतातील एका वर्षाच्या आठवणींनी परदेशी पर्यटक भावुक; 'या देशाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला'

India Women Squad : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या वनडे, टी२० अन् कसोटी संघांची घोषणा! स्मृती मानधना असणार कर्णधार

Maharashtra Live News: मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; मेढ्यात भाजप कार्यकर्ते व नागरिकांचा भव्य मोर्चा, कठोर कारवाईचा इशारा

Kolhapur Talent: एका इन्स्टा व्हिडीओने उघडले नशिबाचे दार; कोल्हापुरातून थेट अमेरिकेच्या बॉय बँडमध्ये एन्ट्री! जाणून घ्या दर्शन मगदूमचा भन्नाट प्रवास

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

SCROLL FOR NEXT