मुंबई

अटल सेतू-मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दरम्यानच्या जोडमार्गाचे ६७ टक्के काम पूर्ण

CD

मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ वाचणार
अटल सेतू-एक्स्प्रेसदरम्यानचे ६७ टक्के काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : एमएमआरडीएकडून अटल सेतू ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेदरम्यान ७.३५ किलोमीटर लांबीचा सहापदरी उन्नत जोडमार्ग उभारला जात आहे. त्याचे ६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते पुणे प्रवासाच्या वेळेत सुमारे ६० ते ९० मिनिटांची बचत होणे अपेक्षित आहे. तसेच मुंबई, नवी मुंबई आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गादरम्यानची वाहतूक वेगवान होणार आहे.
अटल सेतूमुळे निर्माण झालेल्या दळणवळण सुविधांचा विस्तार करणारा अटल सेतू ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. अटल सेतूला थेट मुंब-पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडून वाहतुकीतील प्रमुख अडथळे दूर करणे, वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत करणे आणि कार्यक्षम प्रादेशिक वाहतूक जाळे विकसित करणे, हा एमएमआरडीएचा उद्देश आहे.
पनवेल मुख्य जंक्शन परिसरात, वाहतुकीचा अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. या ठिकाणी अटल सेतूवरून येणारी वाहतूक प्रमुख महामार्गांवरील वाहतुकीशी एकत्रित होते. ही समस्या दूर करण्यासाठी एमएमआरडीए चिर्ले आणि पळस्पे विभागांतून स्वतंत्र सहापदरी उन्नत मार्ग विकसित करत आहे.
...
बांधकामाची सद्यःस्थिती
चिर्ले आणि पळस्पे या दोन्ही विभागांतील एकूण बांधखामाचा विचार करता ६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या बांधकाम वेगाने सुरू असून, पाया, स्तंभ, गर्डर आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे.
...
चिर्ले विभाग
- पायाभरणीची कामे - १०० टक्के पूर्ण. यामध्ये ११३ पाइल्स आणि ४२ ओपन फाउंडेशन्सचा समावेश
- स्तंभ उभारणी - ९८ टक्के पूर्ण. एकूण १५५ पैकी १५३ स्तंभ उभारण्यात आले
- गर्डर कास्टिंग आणि फॅब्रिकेशन - बहुतांश काम पूर्ण
- डेक स्लॅबची कामे - ४९ टक्के पूर्ण. एकूण २४० स्पॅनपैकी ११७ स्पॅनचे काम झाले
- रिइन्फोर्स्ड अर्थ वॉल पॅनेल कास्टिंग ९० टक्के पूर्ण
- रेल्वे उड्डाणपूलांचे ८५ टक्के काम पूर्ण
...
पळस्पे विभाग
- पाइल-ग्रुप फाउंडेशन्स - ७१ टक्के पूर्ण. एकूण २१ पैकी १५ गटांचे काम पूर्ण
- स्तंभांचे कास्टिंग ३८ टक्के पूर्ण
- गर्डर कास्टिंग शंभर टक्के पूर्ण
- रिइन्फोर्स्ड अर्थ वॉल पॅनेलची कामे ९० टक्के पूर्ण
- रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surakumar Yadav: सूर्यकुमार पुन्हा झाला कर्णधार! BCCI च्या T20 स्पर्धेत करणार मुंबईचं नेतृत्व

Amba River Pollution: अंबा नदीचे पाणी शेवाळ आणि केमिकलमुळे प्रदूषित; पालीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Oil Price: कच्च्या तेलाचे दर आठवडाभरात १७ टक्क्यांनी घसरले; भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Maharashtra Live News: ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यावरून राहुल गांधींचे मोदींना पुन्हा चर्चेचे आव्हान

भारतातील एका वर्षाच्या आठवणींनी परदेशी पर्यटक भावुक; 'या देशाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला'

SCROLL FOR NEXT