ठाणे जिल्ह्यात उडणाऱ्या
फटाक्यांवर दोन महिने बंदी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : शहरात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फटक्यांमुळे झालेल्या अग्नितांडवामुळे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात रॉकेटसह हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर दोन महिने बंदी घातली आहे. त्यानुसार इमारतींची गच्ची, बाल्कनी, पार्किंग, आवार आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात ९ नोव्हेंबर २०२६ ते ८ जानेवारी २०२७ या कालावधीत ही बंदी लागू राहणार आहे.
प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील कलम ५१ आणि ६० नुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात सार्वजनिक आणि खासगी मालमत्ता आणि जीवितहानीस कारणीभूत ठरणाऱ्या संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस, अग्निशमन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देण्यात आले आहेत. गृहनिर्माण संस्थांनाही रहिवाशांपर्यंत आदेश पोहोचविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
…………..
मुंबईत २५ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंध
मुंबई शहर आणि उपनगरांत फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रॉकेटसह आकाशात उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर प्रतिबंधात्मक बंदी घातली आहे. मुंबई महापालिका हद्दीत ९ ते २५ नोव्हेंबरपर्यंत रात्री ११.५९ पर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त (प्रभारी) प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित तरतुदींनुसार हा आदेश जारी केला आहे. संबंधित परिमंडळांचे पोलिस उपायुक्त, महापालिकेचे विभागीय सहाय्यक आयुक्त आणि अग्निशमन दल यांनी आदेशाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.