मुंबई

विक्रमगडमध्ये दिवाळीचा जल्लोष!

CD

विक्रमगडमध्ये दिवाळीचा जल्लोष!
रोषणाई, फटाके अन् किल्ल्यांनी सणाला रंगत

विक्रमगड (बातमीदार) : विक्रमगड शहरासह तालुक्यात दिवाळीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. अभ्यंगस्नान आणि लक्ष्मीपूजन पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरे करण्यात आले. घरांवरील विद्युत रोषणाई, आकर्षक आकाशकंदील, फटाक्यांची आतषबाजी, महिलांनी रेखाटलेल्या रांगोळ्या आणि बच्चेकंपनीने उभारलेल्या गड-किल्ल्यांमुळे शहरासह ग्रामीण भाग दीपोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाला आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान केल्यानंतर नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली. बाजारपेठेत नवीन हिशोबाच्या चोपड्या, दिनदर्शिका आणि लक्ष्मीच्या प्रतिमा खरेदीसाठी गर्दी झाली होती. व्यापाऱ्यांनी दुकानांतील यंत्रांसह हिशोबाच्या वह्यांचे पूजन करून नववर्षाचा शुभारंभ केला.
घराघरांत फराळाचे विविध पदार्थ तयार करण्यात आले असून, नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या भेटीगाठींनी सणाचा आनंद द्विगुणित केला आहे. ग्रामीण भागात शेणाच्या पाच पुंजक्यांची झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची पारंपरिक प्रथाही जपली जात आहे. हे पुंजके सुकल्यानंतर शेतात टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढते, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे.
दिवाळीचे औचित्य साधून लहान मुलांनी शहरासह ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती उभारल्या आहेत. त्यावर मावळे, हत्ती आणि शिवरायांच्या मूर्तींची मांडणी करून ऐतिहासिक वातावरण निर्माण केले आहे. तुळशीच्या लग्नापर्यंत हे किल्ले जपण्याची परंपरा आहे. नोकरदार वर्गाला सुट्ट्या असल्याने अनेकांनी गावी येऊन कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद घेतला.वसुबारसपासून सुरू झालेल्या दीपोत्सवात धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा सणांच्या माध्यमातून विक्रमगडमध्ये परंपरा आणि उत्साहाचा संगम अनुभवायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surakumar Yadav: सूर्यकुमार पुन्हा झाला कर्णधार! BCCI च्या T20 स्पर्धेत करणार मुंबईचं नेतृत्व

Amba River Pollution: अंबा नदीचे पाणी शेवाळ आणि केमिकलमुळे प्रदूषित; पालीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Oil Price: कच्च्या तेलाचे दर आठवडाभरात १७ टक्क्यांनी घसरले; भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Maharashtra Live News: ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यावरून राहुल गांधींचे मोदींना पुन्हा चर्चेचे आव्हान

भारतातील एका वर्षाच्या आठवणींनी परदेशी पर्यटक भावुक; 'या देशाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला'

SCROLL FOR NEXT