मुंबई

‘देवाभाऊ चष्म्या’ची जागतिक मंचावर दखल

CD

बदलापूरचा ३३ रुपयांचा चष्मा जागतिक व्यासपीठावर!
ग्लोबल आय हेल्थ समिटमध्ये दखल

बदलापूर, ता. ११ (बातमीदार) : आर्थिक परिस्थितीमुळे नेत्रतपासणी आणि चष्मा खरेदी करणे परवडत नसलेल्या नागरिकांसाठी बदलापूरमधून सुरू झालेला अवघ्या ३३ रुपयांत चष्मा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. ‘देवाभाऊ चष्मा’ या उपक्रमाची अँटिग्वा आणि बार्बुडा येथे झालेल्या जगातील पहिल्या ग्लोबल आय हेल्थ समिटमध्ये दखल घेण्यात आली. बदलापूरच्या व्हिजन फ्रेंड साकीब गोरे फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाने अत्यल्प किमतीत दृष्टिदोष असलेल्या नागरिकांना चष्मा उपलब्ध करून देण्याचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

दृष्टी ही प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गरज असली, तरी आर्थिक अडचणींमुळे अनेकांना वेळेवर नेत्रतपासणी करून घेणे किंवा आवश्यक चष्मा खरेदी करणे शक्य होत नाही. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा अधिक फटका बसतो. ही गरज लक्षात घेऊन केवळ ३३ रुपयांत चष्मा उपलब्ध करून देण्याची संकल्पना राबविण्यात येत आहे. परवडणाऱ्या दरात नेत्रआरोग्याची सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या या प्रयत्नाची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

अँटिग्वा आणि बार्बुडा येथे पार पडलेल्या या जागतिक परिषदेला सहा देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांसह एकूण ३४ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जगभरातील कोट्यवधी नागरिकांना भेडसावणाऱ्या दृष्टिदोषाच्या समस्येवर प्रभावी आणि सर्वसमावेशक उपाययोजना करण्याबाबत परिषदेत चर्चा झाली. विशेष म्हणजे, दृष्टिदोष निवारणासाठी १२० देशांनी एकत्रितपणे १.३२ अब्ज डॉलर खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे.


सर्वसामान्यांना दृष्टीची सुविधा
जागतिक स्तरावर नेत्रआरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना, बदलापूरसारख्या छोट्या शहरातून सुरू झालेल्या ३३ रुपयांच्या चष्मा उपक्रमाची दखल घेतली जाणे महत्त्वाचे मानले जात आहे. अत्यल्प खर्चात सर्वसामान्यांना दृष्टीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न स्थानिक सामाजिक उपक्रमांनाही जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी असल्याचे अधोरेखित करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Foreign Policy : हैदराबादमध्ये १३-१४ नोव्हेंबरला काँग्रेसची ‘भारत समिट’; ७० देशांतील एक हजार प्रतिनिधींसमोर राहुल गांधी मांडणार भारताच्या परराष्ट्र धोरणाचा दृष्टिकोन

Trump Immigration Policy : ट्रम्प यांची भूमिका अचानक बदलली! स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याचे धोरण कठोर असल्याची कबुली; भारत-पाकिस्तान अणुयुद्धाबाबतही पुन्हा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : लोहारा येथे महिला घरात मृतावस्थेत आढळली; परिसरात हळहळ

Microsoft AI Policy : ६० हजार कर्मचाऱ्यांसमोर स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव, त्यातच मायक्रोसॉफ्टच्या धोरणांवर टीका; एआयमुळे नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी त्रस्त?

Flight Hijack Scare : विमानाचे उड्डाण होणार इतक्यात टॉयलेटच्या आरशावर दिसला 'तो' मेसेज; १०५ प्रवाशांचा जीव टांगणीला!

SCROLL FOR NEXT