मुंबई

पाणी शटडाऊनची माहिती ४८ तास आधी एसएमएसद्वारे द्या

CD

पाणीकपातीची पूर्वसूचना द्या!
राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेकडे मागणी

कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचत नसल्याने ऐनवेळी पाण्याचे नियोजन करताना रहिवाशांची गैरसोय होते. ही समस्या टाळण्यासाठी पाणीपुरवठा बंद (शटडाऊन) ठेवण्याची माहिती किमान ४८ तास आधी नागरिकांना एसएमएसद्वारे द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाचे बजरंग तांगडकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग शटडाऊनची माहिती प्रामुख्याने प्रसारमाध्यमांद्वारे देतो, मात्र ही माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत वेळेत पोहोचत नसल्याने पाणी साठवण्याचे नियोजन कोलमडते. काही दिवसांपूर्वी पाण्याची पातळी अचानक घटल्याने शटडाऊन घेण्यात आला होता, मात्र त्याची माहिती उशिरा मिळाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाण्याचे नियोजन करताना अडचणी येतात. यामुळे सोसायटी व्यवस्थापन आणि रहिवाशांमध्ये वादही निर्माण होतात.

ही गैरसोय टाळण्यासाठी शटडाऊनच्या किमान ४८ तास आधी नागरिकांच्या मोबाईलवर मराठी भाषेत एसएमएस पाठवावा. त्यामध्ये पाणीपुरवठा कोणत्या दिवशी, किती वाजता बंद होणार आणि किती तास बंद राहणार, याची स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

महापालिकेकडे मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध आहेत. मालमत्ता कराच्या भरण्याबाबत ज्याप्रमाणे एसएमएस पाठवले जातात, त्याच पद्धतीने पाणीपुरवठा बंदची पूर्वसूचनाही देता येईल. यासाठी अतिरिक्त खर्चाची आवश्यकता नसून, एका संदेशामुळे हजारो नागरिकांना नियोजन करणे शक्य होईल, असे तांगडकर यांनी म्हटले आहे.

या मागणीवर १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ना भाषा आडवी आली, ना अंतर! आफ्रिकेतील विद्यार्थ्यांनी सादर केला प्रतापगडाचा 'तो' ऐतिहासिक प्रसंग; VIDEO व्हायरल

Turkey Climate Summit : युरोपात उष्णतेची लाट, नेपाळमध्ये महापूर अन् जगासमोर ऊर्जा संकट; हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तुर्कीयेत जागतिक नेते एकवटले

Latest Marathi News Live Update : लोहारा येथे महिला घरात मृतावस्थेत आढळली; परिसरात हळहळ

उद्या मंगळाचं नक्षत्र परिवर्तन! ५ राशींचं नशीब पालटणार; आर्थिक परिस्थिती सुधारणार, करिअरमध्येही मोठी प्रगती

Yavatmal Student News : मुंबईतील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, कुटुंबीयांचा दोन महिन्यांपासून पाठपुरावा; आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT