मुंबई

शिवसेना शाखाप्रमुखावर चाकूने हल्ला

CD

उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : शिवसेनेच्या शाखाप्रमुखपदावरून पेटलेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाल्याने उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मराठा सेक्शन परिसरातील शाखाप्रमुख विशाल बाविस्कर यांच्यावर पाठीमागून चाकूने सपासप वार करण्यात आले. विशेष म्हणजे, या जीवघेण्या हल्ल्याचा शिंदे गटाच्या शिवसेनेच्याच नगरसेवकाच्या पुतण्यावर आरोप असून, घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेच्या शाखाप्रमुखपदावरून निर्माण झालेल्या वादातून मराठा सेक्शन परिसरातील शाखाप्रमुख विशाल बाविस्कर (वय ४४) यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना सोमवारी (ता. ९) मध्यरात्री घडली. या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर आणि दोन्ही मनगटांवर चाकूचे अनेक वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात शिंदे गटाचे नगरसेवक चंद्रशेखर यादव यांचा पुतण्या चिराग याच्यावर हल्ल्याचा संशय आहे. शाखाप्रमुखपद मिळविण्यासाठी विशालने शेखरची मदत घेतल्याच्या मुद्द्यावरून चिरागने त्यांच्याशी वाद घालत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत विशालने शेखरकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी चिरागला समज देत त्याच्या कानशिलात लगावली होती. याच रागातून मध्यरात्रीच्या सुमारास जिजामाता गार्डनजवळील आशीर्वाद रुग्णालयासमोर विशालवर पाठीमागून चाकूने हल्ला केल्याचा संशय आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Fertilizer Subsidy Hike : रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खतांच्या अनुदानात तब्बल ६४% वाढ, DAP ची गोणी कितीला मिळणार?

Oxford Naga Remains : १०० वर्षांनंतर पूर्वज परतले! इंग्रजांनी पळवून नेलेल्या ३९ मानवी कवट्या अखेर भारताला परत; लंडनमध्ये ऐतिहासिक सोहळा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! रत्नागिरी-रायगडमधील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

IND A vs ENG A: पुणे-मुंबईत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे अन् टी२० सामन्यांसाठी भारतीय महिला अ संघाची घोषणा; अनुष्का शर्मा कर्णधार

SCROLL FOR NEXT