मुंबई

जेएनपीए ट्रस्टी निवडणुकीवरून वाद

CD

उरण, ता. ११ (वार्ताहर) : ‘जेएनपीए’च्या दोन कामगार ट्रस्टीपदांसाठी येत्या १४ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत प्रथमच जेएनपीए ऑफिसर्स असोसिएशनलाही सहभागी होण्यास मुंबई कामगार उपायुक्त संजय दाबी यांनी मान्यता दिली आहे, मात्र उपायुक्तांच्या या निर्णयाला ‘जेएनपीए’तील चारही कामगार संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी १२ नोव्हेंबरला कामगार आयुक्तांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीतील अंतिम निर्णयावरच ट्रस्टी निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याने जेएनपीए कामगारांचे लक्ष बैठकीकडे लागले आहे.

जेएनपीएच्या दोन कामगार ट्रस्टीपदांसाठी १४ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आतापर्यंत चार कामगार संघटना सहभागी होत होत्या, मात्र यंदा ऑक्टोबर २०१३ मध्ये नोंदणी झालेल्या जेएनपीए ऑफिसर्स असोसिएशनलाही निवडणूक लढविण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कामगार संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे.

जेएनपीए ऑफिसर्स असोसिएशन मागील १३ वर्षांपासून बंदरातील कामगार आंदोलने, विविध निवडणुका तसेच अन्य कामगारविषयक प्रक्रियांमध्ये सहभागी झालेली नाही. त्यामुळे अशा संघटनेला ट्रस्टी निवडणुकीत सहभागी होण्याची परवानगी देणे चुकीचे असल्याची भूमिका चारही कामगार संघटनांनी घेतली आहे. कांडला बंदरातील (दीनदयाळ बंदर प्राधिकरण) ट्रस्टी निवडणुकीतही ऑफिसर्स असोसिएशनला सहभागी होता येणार नसल्याचा निर्णय तेथील कामगार आयुक्तांनी घेतल्याचा दाखला संघटनांनी दिला आहे. हाच निकष ‘जेएनपीए’मध्येही लागू करावा, अशी त्यांची मागणी आहे.

‘एम्प्लॉइज’ शब्दाचा आधार
पूर्वीच्या इंडस्ट्रियल डिस्प्युट्स ॲक्ट १९२७ मध्ये ‘वर्कर्स’, तर नव्या इंडस्ट्रियल रिलेशन्स ॲक्ट २०२६ मध्ये ‘एम्प्लॉइज’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. केवळ ‘एम्प्लॉइज’ या शब्दाचा आधार घेऊन ऑफिसर्स असोसिएशनला निवडणूक लढविण्याची परवानगी देण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Immigration Policy : ट्रम्प यांची भूमिका अचानक बदलली! स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याचे धोरण कठोर असल्याची कबुली; भारत-पाकिस्तान अणुयुद्धाबाबतही पुन्हा मोठा दावा

Microsoft AI Policy : ६० हजार कर्मचाऱ्यांसमोर स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव, त्यातच मायक्रोसॉफ्टच्या धोरणांवर टीका; एआयमुळे नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी त्रस्त?

Latest Marathi News Live Update : वाशिम जिनिंगमध्ये उघड्यावर साठवून ठेवलेल्या दहा हजार क्विंटल कापसाला आग

Flight Hijack Scare : विमानाचे उड्डाण होणार इतक्यात टॉयलेटच्या आरशावर दिसला 'तो' मेसेज; १०५ प्रवाशांचा जीव टांगणीला!

China Economic Crisis : चीनच्या अर्थव्यवस्थेची दोन टोके; तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती, मात्र बेरोजगारी आणि घसरत्या गुंतवणुकीमुळे आर्थिक आव्हाने कायम

SCROLL FOR NEXT