मुंबई

मोहोनेचा दफनभूमी प्रश्न ऐरणीवर

CD

मोहोनेचा दफनभूमी प्रश्न ऐरणीवर
केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर तणाव निवळला
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : मोहोने येथील वसीमुनिसा काझी यांच्या दफनविधीसाठी कुटुंबीयांना तब्बल १० तास प्रतीक्षा आणि संघर्ष करावा लागला. दोन कब्रस्तानांमध्ये दफनविधीस परवानगी नाकारण्यात आल्याने निर्माण झालेला तणाव अखेर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर निवळला. प्रशासनाने दफनभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर कल्याण पश्चिमेतील टेकडी कब्रस्तानात वसीमुनिसा काझी यांचा दफनविधी करण्यात आला.

वसीमुनिसा काझी या गेल्या काही दिवसांपासून कोमामध्ये होत्या. मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाल्यानंतर कुटुंबीयांनी दफनविधीची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांचा मृतदेह उल्हासनगर येथील कब्रस्तानात नेण्यात आला. मात्र, संबंधित कुटुंबीय आमच्या हद्दीत राहत नसल्याचे कारण देत तेथे दफनविधीस परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर कल्याण पश्चिमेतील टेकडी कब्रस्तानातही हद्दीचे कारण पुढे करीत परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे मृतदेह घेऊन कुटुंबीयांना पुन्हा धावपळ करावी लागली.

दोन्ही ठिकाणी परवानगी नाकारल्याने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी मृतदेह थेट महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी प्रेम ऑटो परिसरात त्यांना अडवले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर कुटुंबीय, पोलिस, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. सुमारे तीन तास चाललेल्या चर्चेत मोहोने परिसरातील नागरिकांसाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी दफनभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

मोहोने परिसरातील नागरिकांसाठी टिटवाळा येथे दफनभूमीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या जागेवर भूमाफियांनी कब्जा केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दफनविधीसाठी जागा मिळवताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अखेर केडीएमसी प्रशासनाने दफनभूमीच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेऊन आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले आणि टेकडी कब्रस्तानात दफनविधी पार पडला.

या वेळी काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष नवीन सिंह, ठाकरे गटाचे रुपेश भोईर, महापालिका आणि पोलिस अधिकारी तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Foreign Policy : हैदराबादमध्ये १३-१४ नोव्हेंबरला काँग्रेसची ‘भारत समिट’; ७० देशांतील एक हजार प्रतिनिधींसमोर राहुल गांधी मांडणार भारताच्या परराष्ट्र धोरणाचा दृष्टिकोन

Trump Immigration Policy : ट्रम्प यांची भूमिका अचानक बदलली! स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याचे धोरण कठोर असल्याची कबुली; भारत-पाकिस्तान अणुयुद्धाबाबतही पुन्हा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : लोहारा येथे महिला घरात मृतावस्थेत आढळली; परिसरात हळहळ

Microsoft AI Policy : ६० हजार कर्मचाऱ्यांसमोर स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव, त्यातच मायक्रोसॉफ्टच्या धोरणांवर टीका; एआयमुळे नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी त्रस्त?

Flight Hijack Scare : विमानाचे उड्डाण होणार इतक्यात टॉयलेटच्या आरशावर दिसला 'तो' मेसेज; १०५ प्रवाशांचा जीव टांगणीला!

SCROLL FOR NEXT