मुंबई

नदीपात्रातील भिंतीमुळे पुराचा धोका!

CD

नदीपात्रातील भिंतीमुळे पुराचा धोका!
ओएनजीसी, शिवकर, उसर्लीतील ग्रामस्थ चिंतेत; आरसीसी भिंत हटविण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष आक्रमक
पनवेल, ता. ११ (बातमीदार) : पळस्पे फाटा परिसरातील साई वर्ल्ड सिटी प्रकल्पाच्या नदीपात्रातील आरसीसी भिंतीमुळे ओएनजीसी परिसर, शिवकर, उसर्ली आणि आसपासच्या गावांवर पुराचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्यास पावसाळ्यात गावांमध्ये पाणी शिरून घरे, मालमत्ता आणि शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रातील ही भिंत तातडीने हटवावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा शेतकरी सभेचे अध्यक्ष अनिल ढवळे यांनी केली आहे.
पळस्पे गावात दरवर्षी पुराचे पाणी शिरत असल्याने ग्रामस्थांना नुकसानीचा सामना करावा लागतो. घरातील वस्तू, मालमत्ता आणि शेतीचे नुकसान होते. अशा परिस्थितीत नदीच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यास पुराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नियमभंगाची चौकशी करा
साई वर्ल्ड सिटी प्रकल्पाच्या विकसकाने नदीच्या प्रवाहात आरसीसी भिंत उभारल्याचा आरोप ढवळे यांनी केला आहे. नदीपात्रातील बांधकामाची तांत्रिक तपासणी करावी. तसेच लागू असलेल्या ५० मीटर सीआरझेड मर्यादेचे आणि नदीपात्रासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनाचा इशारा
नदीच्या नैसर्गिक प्रवाहात हस्तक्षेप झाल्यास त्याचे परिणाम आसपासच्या गावांना भोगावे लागतील. त्यामुळे प्रशासनाने ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन तातडीने हस्तक्षेप करावा. नदीपात्रातील आरसीसी भिंत हटविण्याची कार्यवाही न झाल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अनिल ढवळे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ना भाषा आडवी आली, ना अंतर! आफ्रिकेतील विद्यार्थ्यांनी सादर केला प्रतापगडाचा 'तो' ऐतिहासिक प्रसंग; VIDEO व्हायरल

Turkey Climate Summit : युरोपात उष्णतेची लाट, नेपाळमध्ये महापूर अन् जगासमोर ऊर्जा संकट; हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तुर्कीयेत जागतिक नेते एकवटले

उद्या मंगळाचं नक्षत्र परिवर्तन! ५ राशींचं नशीब पालटणार; आर्थिक परिस्थिती सुधारणार, करिअरमध्येही मोठी प्रगती

Latest Marathi News Live Update : लोहारा येथे महिला घरात मृतावस्थेत आढळली; परिसरात हळहळ

६ महिन्यांसाठी केदारनाथचे दरवाजे बंद; आता कुठे होणार बाबांचे दर्शन? २०२७ मध्ये कधी उघडणार मंदिर? जाणून घ्या सविस्तर...

SCROLL FOR NEXT