मुंबई

सुनेत्रा पवारांच्या वाक्याने पुन्हा चर्चांना उधाण

CD

वेळ येईल तेव्हा सर्व गोष्टी समजतील ः सुनेत्रा पवार
विलिनीकरणाबाबत पुन्हा चर्चांना उधाण

बारामती, ता. ११ : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत ‘वेळ येईल तेव्हा सर्व गोष्टी तुम्हाला समजतील,’ असे म्हटल्यामुळे नेमके काय होणार, याबाबत पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
एकीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीची वेळ मागितल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी (ता. ११) बारामतीत माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांनी अगदी एका वाक्यात हा विषय संपविला. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती सुनेत्रा पवार यांनी पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर पत्रकारांनी विलिनीकरणाबाबत विचारल्यानंतर त्यांनी एका वाक्यात हा विषय संपवत यावर अधिकचे भाष्य करण्यास नकार दिला. याबाबत अनेक मतप्रवाह असून, विलिनीकरण करायचेच असेल, तर ते कशा पद्धतीने होणार, कोण कोणात विलीन होणार, कोण नेतृत्व करणार, भाजपसोबत ज्येष्ठ नेते शरद पवार जाणार का, यासारखे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. दरम्यान, सुनील तटकरे यांनीही दादा असते, तर विलिनीकरण झाले असते, अशी भूमिका मांडत आपल्याला याबाबत माहिती असल्याचे स्पष्ट केले आहे. तटकरे यांनी मंगळवारी (ता. १०) सुनेत्रा पवार यांची काटेवाडी येथील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केलेली होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेमके काय सुरू आहे, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs ENG A: पुणे-मुंबईत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे अन् टी२० सामन्यांसाठी भारतीय महिला अ संघाची घोषणा; अनुष्का शर्मा कर्णधार

Stories from The Forgotten War : ७४ वर्षांनंतर कोरियन युद्धातील अमेरिकन सैनिक दक्षिण कोरियात परतले; शहीद मित्रांच्या आठवणींनी दाटला कंठ!

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा तिढा कायम; पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षतेखाली झालेली दुसरी बैठकही निष्फळ

जबाबदारीने बोला! माझं आयुष्य समाजसेवा अन् राष्ट्रहितासाठी समर्पित; सोनिया गांधींच्या पुस्तकातील उल्लेखावर अण्णा हजारेंचा संताप

MI Captaincy : हार्दिक पांड्या तर पंजाबमध्ये गेला, मग मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण होणार? फ्रँचांयझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT