मुंबई

सज्ञान तरुणीला जोडीदार निवडण्याचा अधिकार - उच्च न्यायालय

CD

सज्ञान तरुणीला जोडीदार निवडीचा अधिकार
पोलिसांना कायद्याच्या चौकटीत कर्तव्य बजावण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे पालकांनी जबरदस्तीने उत्तर प्रदेशात नेल्याचा आरोप करणाऱ्या २१ वर्षीय  सज्ञान तरुणीला स्वतःच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचा आणि त्याच्यासोबत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे तसेच तिला स्वेच्छेने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे निरीक्षणही उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नुकतेच नोंदवले. तसेच पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच कर्तव्य बजावावे, असेही आदेश दिले.

याचिकाकर्तीने पोलिस संरक्षणासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. रंजितसिंह राजे भोसले आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी झाली. आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकार हा संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकाराचा अविभाज्य भाग असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. धर्म, जात किंवा श्रद्धा कोणतीही असो; जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्या व्यक्तीला आहे, असे अधोरेखित करून सर्वोच्च न्यायालयाच्या शफीन जहाँविरुद्ध अशोकन के. एम. या निकालाचा संदर्भही खंडपीठाने दिला. याचिकाकर्ती प्रौढ असल्याने ती स्वतःचा विचारपूर्वक निर्णय घेण्यास सक्षम आहे. कोणत्याही दबावाशिवाय तिला स्वतःच्या इच्छेनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले. पोलिसांच्या वर्तनाबाबत याचिकाकर्त्याच्या वकिलांनी व्यक्त केलेल्या शंकेवर सध्या कोणतेही भाष्य करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच कर्तव्य पार पाडावे, असेही स्पष्ट करून न्यायालयााने याचिका निकाली काढली.

प्रकरणाची पार्श्वभूमी
याचिकाकर्ती २१ वर्षीय हिंदू असून, तिचे मुस्लिम तरुणाशी पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबांना या प्रेमसंबंधांची कल्पना होती. १९ ऑक्टोबर २०२६ला दोघांनी विवाह केला. त्यानंतर संभाव्य विरोधाच्या भीतीपोटी त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन विवाहाची माहिती देऊन संरक्षण मागितले. मात्र, धारावी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. त्यानंतर पालकांनी तिला जबरदस्तीने उत्तर प्रदेशात नेल्याचा आरोप तरुणीने केला. मुंबईत परतल्यानंतर तिने सासरच्या घरी राहण्यासाठी पोलिस संरक्षणाची मागणीही केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Germany Kebab Chaos : अवघ्या ९० रुपयांत कबाब खाण्यासाठी रस्त्यावर उतरली तुफान गर्दी; शहरात पेटला भडका, थेट हेलिकॉप्टर पाचारण!

कारगिलमध्ये दुकाने बंद, रस्त्यांवर शुकशुकाट! हिवाळी निवडणुका आणि मतदारसंघ पुनर्रचनेविरोधात नागरिकांचा बंद; पोलिस बंदोबस्तात वाढ

Latest Marathi News Live Update : यवतमाळात एसटी बसची सुरक्षा भिंतीला धडक

UCC Maharashtra News : महाराष्ट्रात समान नागरी कायद्यावरून नवा राजकीय वाद! बिगर हिंदूंवर ‘हिंदू नागरी संहिता’ लादण्याचा प्रयत्न असल्याचा ओवेसींचा आरोप; विधिमंडळात विरोध करणार

Arshdeep Singh ची आधी मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री अन् मग लगेचच उरकला साखरपुडा; कोण आहे जोडीदार? पाहा Photo

SCROLL FOR NEXT