मुंबई

दिवाळीत उल्हासनगरच्या बाजारपेठांत चोरट्यांना दणका

CD

उल्हासनगर, ता. ११ (बातमीदार) : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत पाकीटमार व चोरटे सक्रिय होतात. महिलांच्या सोनसाखळ्या, पर्स, मोबाईल आणि रोकड चोरीला जाण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती असते. मात्र, यंदा पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे बाजारपेठांमधील चोरीच्या घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांनी पोलिसांच्या उपाययोजनांबद्दल समाधान व्यक्त केले.

उल्हासनगर हे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. शहराच्या पश्चिम भागात कापड, फर्निचर, रेडिमेड कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी, सराफ आणि पादत्राणांच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. दिवाळीच्या काळात या बाजारपेठांमध्ये उल्हासनगरसह कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातूनही मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी येतात. गर्दीचा फायदा घेत पाकीटमार, मोबाईल चोर आणि महिलांच्या पर्समधील मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय होण्याची शक्यता असते.
यापूर्वी गर्दीत धक्काबुक्की करून खिसे साफ करणे, महिलांच्या पर्समधून रोकड व मोबाईल चोरणे, दुचाकी लंपास करणे अशा घटनांमुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा सचिन गोरे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बंदोबस्त करण्यात आला. उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष आव्हाड यांनी नेहरू चौक, शिरू चौक, गोलमैदान आणि अमन टॉकीज चौक परिसरात, तर मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील इलेक्ट्रॉनिक बाजार, फर्निचर बाजार आणि १७ सेक्शनमधील मोबाईल बाजारात बंदोबस्त ठेवला. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रहार गोडसे यांनी कॅम्प क्रमांक चारमधील बाजारपेठेत, तर हिललाइन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप शिवले यांनी कॅम्प क्रमांक पाचमध्ये सुरक्षेची जबाबदारी सांभाळली. परिणामी, ग्राहकांना सुरक्षित वातावरणात खरेदी करता आले.

दिवाळीच्या सणात नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद असावा, खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना सुरक्षिततेची खात्री मिळावी आणि व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू राहावा, यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. यंदाची दिवाळी सुरक्षिततेच्या दृष्टीनेही समाधानकारक ठरली.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त, उल्हासनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणी बिल्डर जितेंद्र मेहता यांची दीड तास चौकशी

SCROLL FOR NEXT