मुंबई

काळ बदलला, भाऊबीजेचा जिव्हाळा मात्र कायम

CD

वज्रेश्वरी, ता. १२ (बातमीदार) : भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचा उत्सव असलेली भाऊबीज भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात पारंपरिक उत्साहात साजरी झाली. मात्र, काळानुसार या सणाचे स्वरूप बदलले आहे. पूर्वीच्या भाऊबीजेतील साधेपणा, कौटुंबिक ओढ आणि परंपरांचा गोडवा काहीसा कमी होत असल्याची खंत जुन्या पिढीतील महिलांकडून व्यक्त होत आहे.

पूर्वी भाऊबीज म्हणजे केवळ ओवाळणी आणि भेटवस्तूंचा सोहळा नव्हता, तर वर्षभर माहेरच्या भेटीची वाट पाहणाऱ्या बहिणीची आणि बहिणीला भेटण्यासाठी आतुर असलेल्या भावाची भावनिक भेट असायची. ग्रामीण भागात लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला भाऊबीजेच्या निमित्ताने माहेरी आणण्याची परंपरा होती. भाऊही बहिणीच्या घरी जाण्यासाठी आवर्जून वेळ काढत असे. काही ठिकाणी भाऊ बैलगाडीतून, तर काही जण पायी प्रवास करून बहिणीच्या घरी पोहोचत असत. गणेशपुरीजवळील टोकरवीरा पाडा येथील कुसुम कुवरा यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना ही माहिती दिली.
भाऊबीजेच्या दिवशी घरासमोरील अंगण शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढली जात असे. दारात आंब्याच्या पानांचे तोरण आणि देवघरात लावलेला दिवा असे प्रसन्न वातावरण असायचे. बहीण भावासाठी लाडू, करंजी, चकली, चिवडा आणि शंकरपाळे असा घरगुती फराळ तयार करायची. भावाला पाटावर बसवून कपाळावर कुंकवाचा टिळा लावून अक्षता टाकल्या जात. निरांजन, फुले आणि ओवाळणीच्या ताटाने औक्षण करून भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली जात असे. काही कुटुंबांत या दिवशी भावासाठी खास मांसाहारी भोजनही तयार केले जात असे.

ओवाळणीपेक्षा भावनेला महत्त्व
पूर्वी भावाने बहिणीला दिलेली ओवाळणी महागडी किंवा सोन्या-चांदीची असेलच असे नव्हते. ऐपतीनुसार साडी, खण, नारळ, फळे, भातशेतीतील तांदूळ किंवा एखादी छोटी भेट दिली जात असे. काही ग्रामीण कुटुंबांत धान्याची पोती अथवा शेतातील उत्पन्नही बहिणीला भेट म्हणून दिले जायचे. या भेटवस्तूंपेक्षा त्यामागील प्रेम आणि आपुलकी अधिक मोलाची होती. भाऊबीजेच्या निमित्ताने माहेरच्या माणसांची भेट, सुख-दुःखाची विचारपूस आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळत असे.

आधुनिकतेमुळे सणाचे स्वरूप बदलले
आज मोबाईल, समाजमाध्यमे, ऑनलाइन भेटवस्तू आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे भाऊबीजेच्या परंपरेत बदल झाला आहे. अंबाडी, खंबाळा, वज्रेश्वरी, अकलोली, आनगाव, पडघा आणि वडपा परिसरातील अनेक कुटुंबांमध्ये नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त भावंडे वेगवेगळ्या शहरांत राहत असल्याने प्रत्यक्ष भेटीगाठी कमी झाल्या आहेत. व्हिडिओ संवाद, ऑनलाइन पैसे पाठवणे आणि तयार भेटवस्तू देण्याचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणी बिल्डर जितेंद्र मेहता यांची दीड तास चौकशी

SCROLL FOR NEXT