मुंबई

मालमत्तेच्या वादातून मुलाने बापासह भावावर झाडल्या गोळ्या; दोघेही गंभीर जखमी

CD

मालमत्तेच्या वादातून मुलाचा
वडिलांसह भावावर गोळीबार

कल्याण, ता. ११ (वार्ताहर) ः मालमत्तेच्या वादातून एका ३५ वर्षीय मुलाने स्वतःच्या वडिलांसह सख्ख्या भावावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १०) रात्री साडेदहाच्या सुमारास टिटवाळ्याजवळील गुरवलीपाडा परिसरात घडली. या घटनेत बाळाराम शेलार (५५) आणि त्यांचा मोठा मुलगा भरत शेलार (३७) हे दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाराम शेलार यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांचा मोठा मुलगा भरत याच्या पोटात गोळी अडकल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी कल्पेश शेलार (३५) याने वडील आणि भावावर प्रत्येकी एक गोळी झाडली होती. गोळीबार करून पसार झालेला कल्पेश आणि त्याची पत्नी रसिका (३२) या दोघांना टिटवाळा पोलिसांनी बुधवारी पहाटे नेवाळी परिसरातून अटक केली. कल्पेश हा पत्नी आणि दोन मुलांसह वडिलांपासून वेगळा राहत होता. वडिलांनी मोठा मुलगा भरत याला मालमत्तेतील अधिक हिस्सा दिल्याचा त्याला राग होता. काही दिवसांपूर्वी वडिलांनी कुटुंबाची एक मालमत्ता विकली होती. या व्यवहारातून आपल्याला ७० लाख रुपये मिळायला हवेत, अशी कल्पेशची मागणी होती.

मंगळवारी रात्री कल्पेश पत्नी रसिकासह वडिलांच्या घरी गेला. सामाईक मालमत्तेची विक्री झाल्यानंतर त्यातील आपल्या हिश्श्याची रक्कम का घेतली नाही, असा जाब त्याने वडिलांना विचारला. यावरून त्यांच्यात वाद झाला. कल्पेशने वडिलांना शिवीगाळ करून मारहाण आणि दमदाटी केली. तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या स्थानिक रहिवासी दीपक वाघे यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर त्याने जवळील बंदुकीतून वडील बाळाराम आणि भाऊ भरत यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर कल्पेश पत्नी रसिकासह चारचाकीतून पसार झाला. पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोघांनाही नेवाळी येथून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oxford Naga Remains : १०० वर्षांनंतर पूर्वज परतले! इंग्रजांनी पळवून नेलेल्या ३९ मानवी कवट्या अखेर भारताला परत; लंडनमध्ये ऐतिहासिक सोहळा!

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! रत्नागिरी-रायगडमधील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा तिढा कायम; पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षतेखाली झालेली दुसरी बैठकही निष्फळ

IND A vs ENG A: पुणे-मुंबईत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे अन् टी२० सामन्यांसाठी भारतीय महिला अ संघाची घोषणा; अनुष्का शर्मा कर्णधार

Stories from The Forgotten War : ७४ वर्षांनंतर कोरियन युद्धातील अमेरिकन सैनिक दक्षिण कोरियात परतले; शहीद मित्रांच्या आठवणींनी दाटला कंठ!

SCROLL FOR NEXT